उपचारासाठी आलेल्या 11 वर्षीय मुलीवर बलात्कार, शौचालयात नेऊन कंपाउंडरनेच केला घात; धक्कदायक प्रकरण

रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका 11 वर्षीय मुलीवर कपाऊंडरने लैंगिक अत्याचर केला आहे. या घटनेमुळे खासगी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:03 PM • 04 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

उपचारासाठी आलेल्या 11 वर्षीय मुलीवर बलात्कार

point

शौचालयात नेऊन कंपाउंडरनेच केला घात

point

धक्कदायक प्रकरण

Crime News : एका खासगी रुग्णालयातील कंपाऊंडरने उपचारासाठी आलेल्या 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपी कंपाउंडरला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. बिहारमधील छपरा जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

शौचालयात नेऊन अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, एका 11 वर्षीय मुलीला 'फूड पॉयझनिंग'चा त्रास झाल्यामुळे 2 एप्रिल रोजी रात्री एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पीडित मुलीवर उपचार सुरू असतानाच, रुग्णालयात कार्यरत असलेला कंपाउंडर मोनू याने तिला फसवून शौचालयात नेले आणि तिच्यावर अत्याचार केले.

हे ही वाचा : महाराष्ट्र : लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या प्रियकराचे कांड, 29 वर्षीय विवाहित प्रेयसीला संपवले

कंपाउंडर मोनू ताब्यात

आरोपीने 3 एप्रिल रोजी शौचालयात नेऊन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत आरोपी कंपाउंडर मोनूला ताब्यात घेतले आहे. तसेच रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा : नांदेड तिहेरी हत्याकांडाने हादरले, भावाच्या मर्डरचा बदला घेण्यासाठी 2 खून, एकाला रुग्णालयात घुसून केले ठार

मुलीचे कपडेही जप्त

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे. एफएसएल टीमने घटनास्थळावरून महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले असून पीडित मुलीचे कपडेही तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाच्या सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.