औषध आणून देण्याचे आमिष, विधवा महिलेला निर्जनस्थळी नेऊन सामुहिक बलात्कार

मुंबई तक

• 07:55 AM • 06 Jul 2026

bihar crime news : फोन रिचार्ज आणि औषध आणून देण्याचे आमिष दाखवत विधवा महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील नालंदा जिल्ह्यात घडली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी अवघ्या सहा तासांत तिन्ही आरोपींना अटक केली.

bihar crime news

bihar crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

औषध आणून देण्याचे आमिष

point

विधवा महिलेला निर्जनस्थळी नेऊन सामुहिक बलात्कार

bihar crime news : बिहारमधील नालंदा जिल्ह्यात 35 वर्षीय विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिघा आरोपींनी महिलेला फोन रिचार्ज करून देण्याचे आणि औषध आणून देण्याचे आमिष दाखवत निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या सहा तासांत तिन्ही आरोपींना अटक केली. पीडित महिला नगरनौसा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'तुम्ही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे गुलाम नाहीत, जनतेचे सेवक आहात' हायकोर्टाने पोलिसांना फटकारले

औषध आणून देण्याचे आमिष, अन् सामुहिक बलात्कार 

चंडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या माध्यमातून पीडितेची विकास गोप नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याच विकासने फोन रिचार्ज करून देण्याचे तसेच औषध आणून देण्याचे आमिष दाखवले. 30 जूनच्या सायंकाळी त्याने महिलेला रामपूर हॉल्टजवळ बोलावले. तेथे पोहोचल्यानंतर विकासने तिला दुचाकीवर बसवून एका निर्जनस्थळी नेले. त्यानंतर त्याने आपल्या आणखी दोघा साथीदारांनाही तेथे बोलावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हेही वाचा : 'अहो..आज व्रत आहे', बायको संबंध टाळायची; शेवटी दाढी करताना सापडली अन् सगळं उलगडलं

धमक्यांना न घाबरता पीडितेची पोलिसांकडे धाव

पीडित महिलेच्या आरोपानुसार, निर्जनस्थळी तिन्ही आरोपींनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. आरोपींनी आलटून-पालटून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोपही तिने केला आहे. घटना घडल्यानंतर जर तिने कोणाला माहिती दिली किंवा पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. मात्र धमक्यांना न घाबरता पीडितेने पोलिसांकडे धाव घेत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत चंडी पोलीस ठाण्याने तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकाची स्थापना केली. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी छापेमारी करत अवघ्या सहा तासांत तिन्ही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख लक्ष्मी बगहा येथील विकास कुमार, नीतीश कुमार आणि शैलेश कुमार अशी झाली आहे. चंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंदन कुमार सिंह यांनी सांगितले की, ठाणेप्रमुख अखिलेश झा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या पथकात कॉन्स्टेबल छोटेलाल पासवान आणि आरक्षी सत्यनारायण दास यांचाही समावेश होता. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करून घेतली असून तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठविण्यात आले आहे.