दिव्यांग पती आवडेनासा झाला, बायकोनं प्रियकराच्या मदतीनं केला शेवट

मुंबई तक

• 08:44 AM • 03 Aug 2026

ही घटना बिहारमधील गया जिल्ह्यातील आहे. येथे एका पत्नीचे प्रेमप्रकरण तिच्या दिव्यांग पतीसाठी जीवघेणे ठरले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. तिच्या दिव्यांग पतीला संपवण्यासाठी तिने प्रियकराला प्रवृत्त केले

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दिव्यांग पती आवडेनासा झाला

point

बायकोनं प्रियकराच्या मदतीनं केला शेवट

Crime News : बिहारच्या गया जिल्ह्यातील राजदेव भारती या व्यक्तीच्या हत्याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती एक धक्कादायक माहिती आली आहे. ही हत्या अचानक घडलेली नसून, त्यामागे प्रेमप्रकरण,  कट आणि अनेक व्यक्तींचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. इमामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी राजदेव भारती यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु पोलिसांना संशय आल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.

हे वाचलं का?

दिव्यांग पती नात्यात अडथळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैज्ञानिक तपास, तांत्रिक पुरावे आणि कसून केलेल्या चौकशीनंतर या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाले. मृत राजदेव भारती यांच्या पत्नीचे राजा आलम नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. या नात्यात पती अडथळा ठरत असल्याने पत्नीनेच आपल्या प्रियकराला पतीच्या हत्येसाठी प्रवृत्त केले. यानंतर राजा आलमने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राजदेव यांची गळा आवळून हत्या केली आणि हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा : आम आदमी पार्टी का सोडली? आता राजकारणात जायचं की नाही? अभिजीत दिपकेंनी सगळंच सांगितलं

चारजण ताब्यात

तांत्रिक पुरावे आणि घटनास्थळावरून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृत राजदेव यांच्या पत्नीसह राजा आलम, रोहित कुमार आणि मोहम्मद मुन्ना या चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस सध्या या चौघांची कसून चौकशी करत असून या हत्येच्या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा : डिलिव्हरी पार्टनरचा महिलेकडे घरात येऊ देण्याचा हट्ट! पुढे सगळं अंगलट आलं अन्...

बेकायदेशीर दारुचा व्यवसाय

या प्रकरणाला एक वेगळी बाजूही समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत राजदेव यांची पत्नी कथितपणे बेकायदेशीर दारूच्या व्यवसायातही सहभागी होती आणि तिच्यावर इमामगंज पोलीस ठाण्यात आधीपासूनच एक गुन्हा दाखल आहे. या हत्येचा त्या बेकायदेशीर व्यवसायाशी काही संबंध आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. तसेच या हत्याकांडाशी संबंधित इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापे मारले जात आहेत.