प्रेयसीसोबत राहण्यास मुलांचा अडथळा, 6 महिन्यांच्या बाळाला संपवून नाल्यात फेकलं

मुंबई तक

02 Aug 2026 (अपडेटेड: 02 Aug 2026, 01:25 PM)

meerut crime news : मेरठमध्ये नाल्यात सापडलेल्या सहा महिन्यांच्या बाळाच्या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. नवीन आयुष्य सुरू करण्याच्या हेतूने ही हत्या केल्याचा आरोप आहे.

meerut crime news

meerut crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीसोबत राहण्यास मुलांचा अडथळा,

point

6 महिन्यांच्या बाळाला संपवून नाल्यात फेकलं

meerut crime news : मेरठच्या नौचंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 जुलै रोजी वैशाली कॉलनीजवळील नाल्यात सहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला या बाळाची ओळख पटू शकली नव्हती. मात्र पोलिसांच्या तपासानंतर मृत बाळाची ओळख सहारनपूर येथील इमरान याचा सहा महिन्यांचा मुलगा समीर अशी पटली. या प्रकरणाचा उलगडा करताना पोलिसांनी समीरची आई शबाना आणि तिचा प्रियकर विशाल याला अटक केली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांच्या माहितीनुसार, शबाना आपल्या प्रियकर विशालसोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी घर सोडून निघाली होती. विशालदेखील हापूडहून मेरठमध्ये आला होता. दोघांनी एकत्र राहण्याचा आधीच निर्णय घेतला होता, मात्र विशाल लहान मुलांना आपल्या सोबत ठेवण्यास तयार नव्हता.

हेही वाचा : मासिक पाळीच्या आड नर्स करायची कांड, पोलिसांनाही सापडली नाही, अखेर...

बाळाची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याचा आरोप

पोलिसांच्या तपासानुसार, याच कारणावरून सहा महिन्यांच्या समीरला मार्गातून दूर करण्याचा कट रचण्यात आला. विशालने समीरला एका मित्राकडे सोडून येतो, असे सांगून त्याला आपल्या सोबत नेले. त्यानंतर त्याने बाळाची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. 12 जुलै रोजी हा मृतदेह पाण्यात वाहत असताना सापडला होता, मात्र त्यावेळी त्याची ओळख पटली नव्हती. दुसरीकडे, सहारनपूरच्या गंगोह पोलीस ठाण्यात इमरानने पत्नी शबाना आणि मुलगा समीर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शबानाला शोधून काढले, मात्र समीरचा कोणताही मागमूस लागला नव्हता. शबानानेही मुलाबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. त्याचदरम्यान मेरठमध्ये सापडलेल्या अज्ञात बाळाच्या मृतदेहाचे छायाचित्र आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आले.

हेही वाचा : श्रावण महिन्यात शनिदेवाच्या गतीत बदल, रेवती नक्षत्रातील प्रवेशानं 'या' राशींचे भाग्य उजळणार

शबाना आणि विशाल यांच्याकडून हत्या केल्याची कबुली 

नौचंदी पोलिसांनी मृत बाळाचे छायाचित्र सहारनपूरसह इतर जिल्ह्यांमध्येही पाठवले होते. 13 जुलै रोजी ही माहिती सहारनपूर पोलिसांनाही देण्यात आली होती. छायाचित्र पाहिल्यानंतर इमरानने मृतदेहाची ओळख आपला मुलगा समीर अशी केली. त्यानंतर मेरठ पोलिसांनी या प्रकरणातील सर्व धागेदोरे जोडत तपास शबाना आणि विशाल यांच्याकडे वळवला. सहारनपूरमध्ये दाखल करण्यात आलेली झिरो एफआयआर नंतर मेरठच्या नौचंदी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. त्यानंतर आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पोलिसांनी शबाना आणि विशाल यांची चौकशी केली असता, दोघांनीही हत्या करण्याचा कट रचल्याची आणि गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, इमरानला चार मुले आहेत. शबाना लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडली होती, तर विशाल हापूडहून मेरठमध्ये आला होता. दोघांनी एकत्र पळून जाऊन नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या योजनेत मुलांची उपस्थिती अडथळा ठरत असल्याने समीरला संपवण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे. मेरठचे एसपी सिटी विनायक गोपाल भोसले यांनी सांगितले की, 12 जुलै रोजी नाल्यातून बाळाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आणि ओळख पटवण्यासाठी विविध जिल्ह्यांना माहिती पाठवण्यात आली. सहारनपूरमधील बेपत्ता प्रकरण, झिरो एफआयआर आणि वडिलांनी केलेल्या आरोपांच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध हत्येसह संबंधित कलमांनुसार कारवाई सुरू करण्यात आली असून या प्रकरणातील इतर सर्व बाबींचाही तपास सुरू आहे.