16 वर्षीय मेहुणीवर दाजीकडून लैंगिक अत्याचार, नात्याला काळिमा फासणारा प्रकार

मुंबई तक

• 03:49 PM • 02 Aug 2026

crime news : नात्याला काळिमा फासणारा लज्जास्पद प्रकार उघडकीस आलेला आहे. व्यक्तीने आपल्याच अल्पवयीन मेहुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या आईने तक्रारीच्या आधारे पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गु्न्हा दाखल केला होता.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नात्याला काळिमा फासणारा लज्जास्पद प्रकार

point

दिजीने अल्पवयीन मुहेणीसोबत नको ते केलं

Crime News : नात्याला काळिमा फासणारा लज्जास्पद प्रकार उघडकीस आलेला आहे. व्यक्तीने आपल्याच अल्पवयीन मेहुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या आईने तक्रारीच्या आधारे पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. ही घटना पंजाबच्या तरनतारन येथून उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 16 वर्षीय मुलीचा मृतदेह कबरीतून काढला बाहेर, कुटुंबीयांना ऑनर किलिंगचा संशय

पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानुसार महिलेनं सांगितलं की, तिच्या मोठ्या मुलीचा विवाह तीन वर्षांपूर्वी रणजीत सिंहसोबत झाला होता. कुटुंबीयांनी तरुणाला मुलाप्रमाणे वागवलं विश्वासात देखील घेतलं. महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा जावई रोज घरी ये-जा करायचा. तक्रारीच्या आधारे, 22 जुलै रोजी महिलेनं आपल्याच जावयाला आपल्यासोबत अमृतसरकडे जाण्यास सांगितलं. 

16 वर्षीय मुहेणीसोबत दिजीचे लैंगिक अत्याचार 

परंतु त्याने भाताची लावणी करायची असल्याचे कारण सांगून महिलेसोबत जाण्यास नकार दिला होता. नंतर ती महिला तिच्या 16 वर्षीय मुलीला घरी एकटीच सोडून एका मुलीसोबत अमृतसरला निघून गेली होती. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, घरी परतल्यानंतर तिच्या अल्पवयीन मुलीने तिच्या दीराने केलेल्या लैंगिक अत्याचाराची कबुली दिली होती. 

आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा 

थोरल्या मुलीच्या कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या चिंतेमुळे कुटुंबाने हे प्रकरण लपवलं. नंतर महिलेनं तक्रार दाखल केली असता, तक्रारीनंतर शहर पोलीस ठाण्याने आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा निरीक्षक शोध घेत आहेत. 

हे ही वाचा : होणाऱ्या नवऱ्यासमोर तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, हात स्कार्फने बांधून गुप्तांगावर मारहाण

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील कायदेशीर कारवाई सुरू ठेवण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पुराव्याच्या आधारे कारवाई केली जात आहे.