16 वर्षीय मुलीचा मृतदेह कबरीतून काढला बाहेर, कुटुंबीयांना ऑनर किलिंगचा संशय

मुंबई तक

02 Aug 2026 (अपडेटेड: 02 Aug 2026, 02:15 PM)

crime news : ऑनर किलिंकचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी एका मुलीचा मृतदेह एका कबरीतून बाहेर काढला, नंतर प्रकरणाचा तपास सुरू केला. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पोलिसांनी कबरीतून मुलीचा मृतदेह काढला बाहेर

point

16 वर्षीय मुलीच्या मृत्यूबाबत काय? 

Crime News : ऑनर किलिंकचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी एका मुलीचा मृतदेह एका कबरीतून बाहेर काढला, नंतर प्रकरणाचा तपास सुरू केला. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत मुलीच्या मृत्यूनंतर संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील असून तपासादरम्यान पोलिसांनी धक्कादायक दावे केलेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : होणाऱ्या नवऱ्यासमोर तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, हात स्कार्फने बांधून गुप्तांगावर मारहाण

अलीगढ येथील एका स्थानिक समाजसेवेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली. मुलीचा मृतदेह एका कबरीतून काढण्यात आला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. नंतर शवविच्छेदनाचे अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूमागील खरं कारण स्पष्ट होईल आणि नंतर कारवाई केली जाईल, असं सांगण्यात आले होते. 

16 वर्षीय मुलीच्या मृत्यूबाबत काय? 

घडलेल्या घटनेनुसार, शाहजमाल येथील 16 वर्षीय मुलीच्या मृत्यूबाबत अगदी सुरूवातीपासून संशय व्यक्त करण्यात आला. स्थानिक समाजसेवक दुलारे खान यांनी आरोप केला की, मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक घटना नसून तिची हत्या करण्यात आली. निष्पक्ष चौकशीनंतर मागणी करत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर प्रशासनाने प्रकरण गांभीर्याने घेत मृतदेह बाहेर काढण्याची परवानी दिली होती.

मुलीचा मृतदेह कबरीतून काढला बाहेर

शहर दंडाधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला, नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्रशासनाच्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीतून मुलीचा मृत्यू नैसर्गिक होता, की तिनं आत्महत्या केली किंवा तिला मारहाण करण्यात आलं याची चौकशी शवविच्छेदनातून व्हावी अशी मागणी केली. 

हे ही वाचा : उद्धव ठाकरे असं बोलले की, संजय राऊत जोरात हसले; नेमकं काय म्हणाले?

संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. सुरूवातीला किशोरवयीन मुलीच्या कुटुंबीयांचा मृत्यूमागे भलताच संशय आहे. मात्र, अद्याप कोणावरही अधिकृतपणे हत्येचा आरोप करण्यात आला नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल आणि तपासादरम्यान, सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. संबंधित प्रकरणात दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.