Crime : भयंकर! भाजप नेत्याची निर्घृण हत्या, कुऱ्हाडीने वार करून शरीराचे केले तुकडे तुकडे

प्रशांत गोमाणे

• 03:36 AM • 05 Nov 2023

रतन दुबे यांच्यावर नक्षलवाद्यांनी कुऱ्हाडीने वार करत त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेने राज्यात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सूरू केला आहे.

bjp leader ratan dubey murder case naxal attack in workers meeting baster narayanpur chhattisgarh

bjp leader ratan dubey murder case naxal attack in workers meeting baster narayanpur chhattisgarh

follow google news

Ratan Dubey Murder case : भाजपच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत एका भाजप नेत्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या नेत्यावर कुऱ्हाडीने वार करून हल्ला करत त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले आहेत. रतन दुबे (Ratan Dubey) असे हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. नारायणपूरच्या कौशल नार गावात शनिवारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सूरू केला आहे. (bjp leader ratan dubey murder case naxal attack in workers meeting baster narayanpur chhattisgarh)

हे वाचलं का?

छत्तीसगढमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणूकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीनिमित्त भाजपा नेते रतन दुबे यांनी नारायणपूरच्या कौशल नार गावात कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत अचानक नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात रतन दुबे यांच्यावर नक्षलवाद्यांनी कुऱ्हाडीने वार करत त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेने राज्यात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सूरू केला आहे.

हे ही वाचा : Fact Check: पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला करणाऱ्यांमध्ये मनोज जरांगे होते का?

या संपूर्ण घटनेवर छत्तीसगढचे भाजप प्रभारी ओम प्रकाश माथुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वस्तर जिल्ह्याच्या नारायणपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष रतन दुबे हे कौशल नार गावात कार्यकर्त्यांची बैठक घेत होते. यावेळी नक्षलवाद्यांनी या बैठकीत घुसुन रतन दुबे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांच्या शरीराचे तुकडे करत त्यांची निर्घृण हत्या केली. तसेच या हत्येचा बदला आपण घेऊ, भाजप रतन दुबे यांच्या कुटुंबासोबत असल्याचे ओम प्रकाश माथुर यांनी सांगितले.

    follow whatsapp