भाजप खासदाराच्या घरी चोरी, डुप्लिकेट चाव्यांनी तिजोरी उघडून रोकड केली लंपास

Manoj Tiwari house theft : दिल्लीतील भाजपचे खासदार आणि सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेते, गायक मनोज तिवारी यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मुंबईतील घरी ही चोरी झाली. डुप्लिकेट चाव्यांनी तिजोरी उघडून त्यामध्ये असलेली लाखो रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:43 PM • 18 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजप खासदाराच्या घरी चोरी

point

डुप्लिकेट चाव्यांनी तिजोरी उघडून रोकड केली लंपास

Manoj Tiwari Mumbai house theft : दिल्लीतील भाजपचे खासदार आणि सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेते, गायक मनोज तिवारी यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मुंबईतील घरी ही चोरी झाली. डुप्लिकेट चाव्यांनी तिजोरी उघडून त्यामध्ये असलेली लाखो रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. अंधेरी पश्चिम येथील शास्त्री नगर परिसरातील सुंदरबन अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी तिवारी यांच्या एका माजी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर 5 जणांचा दुर्दैवी अंत

'असे' समोर आले प्रकरण

मनोज तिवारी यांचे मॅनेजर प्रमोद जोगिंदर पांडे यांनी या प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ते गेल्या 20 वर्षांपासून तिवारी यांचे मॅनेजर आहेत. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार,  बेडरूममधून एकूण 5.40 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली.  या रकमेपैकी 4.40 लाख रुपये जून 2025 मध्ये कपाटातून गायब झाले होते, पण  त्यावेळी चोराची ओळख पटली नव्हती. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. 15 जानेवारी 2026  रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही अलर्टमध्ये माजी कर्मचारी चोरी करत असल्याचे उघड झाले.

आरोपीकडे होत्या डुप्लिकेट चाव्या

डिसेंबर 2025 मध्ये घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. 15  जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्ही अलर्टमध्ये माजी कर्मचारी सुरेंद्रकुमार शर्मा चोरी करत असल्याचे उघड झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीकडे घराच्या, बेडरूमच्या आणि वॉर्डरोबच्या डुप्लिकेट चाव्या असल्याचे दिसून आले, ज्यामुळे तो सहज प्रवेश करू शकला.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्या रात्री अंदाजे १ लाख रुपये चोरले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, आरोपीची चौकशी करण्यात आली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

हे ही वाचा : बीड : जीएसटी अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पोलिसांनी उचललं

कोण आहे आरोपी?

तिवारी यांच्या मुंबईतील घरी हा आरोपी अनेक वर्षांपासून काम करत होता. सुरेंद्रकुमार शर्मा असं आरोपीचं नाव आहे. दोन वर्षांपूर्वीच त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. दरम्यान, अंबोली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे आणि संबंधित कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
 

    follow whatsapp