वहिनीचं तोडलेलं मुंडकं हातात घेऊन फिरत होता गावभर.. दीर नव्हे सैतान!

Crime News : पश्चिम बंगालच्या दक्षिण परगणा येथे धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने आपल्याच वहिणीवर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. त्यानंतर तिचं मुंडकं छाटून दुसऱ्या हातात धारदार शस्त्र घेत तो रस्त्यावर फिरू लागला. यामुळे घटनास्थळावरील परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

वहिनीची हत्या करून मुंडकं हातात घेऊन फिरत होता दीर

वहिनीची हत्या करून मुंडकं हातात घेऊन फिरत होता दीर

मुंबई तक

03 Jun 2025 (अपडेटेड: 03 Jun 2025, 04:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पश्चिम बंगालच्या दक्षिण परगणा येथे धक्कादायक घटना घडली

point

दीराने वहिनीची केली हत्या

Crime News: पश्चिम बंगालच्या दक्षिण परगणा येथे धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने आपल्याच वहिनीवर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. त्यानंतर तिचं मुंडकं छाटून दुसऱ्या हातात धारदार शस्त्र घेत तो रस्त्यावर फिरू लागला. या  घटनेनं घटनास्थळावरील परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : गुरू आणि शुक्र एकत्र आल्याने 'या' राशीच्या लोकांचे खिसे नेहमीच भरलेले राहतील

आरोपी रस्त्यावरुन वहिणीचं मुंडकं घेऊन फिरत होता

क्रूरकर्म करणारा व्यक्ती हा महिलेचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावरुन फिरत होता. त्यानंतर तो एका मंदिराजवळ जाऊन शस्त्र दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, ही घटना पश्चिम बंगालच्या दक्षिण परगणातील बसंती भागातील भरतगड येथील आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

दीराने आपल्या वहिनीच्या गळ्यावर वार करुन हत्या केली. त्यानंतर वहिनीचं मुंडकं हातात घेऊन तो रस्त्यावर फिरत होता. आरोपी दीराचे नाव बिमल मंडल असे आहे. दरम्यान, ही घटना शनिवारी सकाळी घडली होती. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला गजाआड टाकलं आहे. 

क्रूर आरोपी गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. ज्यावेळी आरोपीला पकडण्यात आलं होते तेव्हा तो रागाने लालबुंद झाला होता. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी क्रूर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

हेही वाचा :  वाद पेटला, डोक्यात टिकाव घातला, 60 वर्षाच्या संजय यांना जागीच संपवलं! CCTV फुुटेज पाहून अकोला हादरला

दरम्यान, आता आरोपीच्या मानसिक आरोग्याची तपासणी करणार आहेत. कौटुंबिक कलह असला तरीही असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला असू शकतो, असे पोलिसांनी सांगितले आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

    follow whatsapp