जिममध्ये सुरु होतं बर्थडे सेलिब्रेशन, तोंडाला फक्त केक लावला अन् घडलं हत्याकांड; किती जणांनी गमावला जीव?

एका जिमममध्ये वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरु असताना झालेल्या वादात भीषण हत्याकांड घडले आहे. यामागे राजकीय वैमनस्य असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

26 Apr 2026 (अपडेटेड: 26 Apr 2026, 09:39 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जिममध्ये सुरु होता वाढदिवस

point

तोंडाला फक्त केक लावला अन् घडलं हत्याकांड

point

किती जणांनी गमावला जीव?

Crime News : एका वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या वादात तिघा जणांची हत्या झाली आहे.  केक लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले असून, आरोपीने केलेल्या बेछूट गोळीबारात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेत डीआईजी कलानिधि नैथानी यांनी तातडीने तपासासाठी अनेक पथके तैनात केली आहेत. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील ही घटना आहे. 

हे वाचलं का?

रागाच्या भरात डोक्यात झाडल्या गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार, बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा परिसरातील एका जिममध्ये शनिवारी जीतू नावाच्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा केला जात होता. या पार्टीत जीतू आणि मनीष नावाच्या तरुणांमध्ये तोंडाला केक लावण्यावरून किरकोळ बाचाबाची झाली. मात्र, या वादाने रौद्र रूप धारण केले आणि संतापलेल्या जीतूने बंदूक काढून मनीष, त्याचा चुलत भाऊ अमरदीप आणि पुतण्या आकाश यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. आरोपीने तिघांच्याही डोक्यात अनेक गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच अंत झाला.

हे ही वाचा : ब्युटी पार्लरचं ओपनिंग 6 दिवसांवर येऊन ठेपलं.., अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार असतानाच शिल्पाचा मृतदेह सापडला

राजकीय वैमनस्याचा अँगल

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मेरठ रेंजच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही तरुणांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जीतू हा समाजवादी पक्षाचा माजी नगर अध्यक्ष आहे, तर मृत झालेले तिन्ही तरुण भाजपशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी सध्या काही संशयितांना ताब्यात घेतले असून राजकीय वैमनस्याच्या अँगलनेही तपास सुरू केला आहे, तरीही प्राथमिक दृष्ट्या केकचा वादच या हत्येचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.

हे ही वाचा : 70 वर्षीय वृद्धाने 26 वर्षीय दिव्यांग तरुणीवर केला बलात्कार, बायकोला दूध आणायला पाठवलं अन्..

जुने शत्रुत्व, राजकीय संबंध आणि पार्टीतला वाद

सध्या मुख्य आरोपी जीतू फरार असून पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. डीआईजी कलानिधि नैथानी यांनी स्पष्ट केले आहे की, पोलीस जुने शत्रुत्व, राजकीय संबंध आणि पार्टीत झालेला वाद अशा सर्व बाबींची सखोल चौकशी करत आहेत. या भीषण हत्याकांडामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण खुर्जा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.