Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून सामूहिक बलात्काराचं भयानक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथील सचेंडी परिसरात एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने कारमध्ये बसवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पीडिता रात्री शौचासाठी घराबाहेर पडली असता जवळच उभ्या असलेल्या कारमधील तरुणांनी तिला बळजबरीने गाडीत बसवलं आणि त्यानंतर, तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. घटनेनंतर, आरोपीने रात्री पीडितेला घराजवळ सोडून नंतर फरार झाले. तरुणीच्या कुटुंबियांनी सचेंडी पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. तसेच, पीडितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींपैकी एक तरुण पोलिसांच्या वर्दीत असल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
बळजबरीने गाडीत बसवलं अन् बलात्कार
आरोपानुसार, तरुणांनी पीडितेला बळजबरीने गाडीत बसवलं आणि नंतर तिला रेल्वे ट्रॅकजवळील एका निर्जन ठिकाणी नेण्यात आलं. तिथे, सुमारे 2 तास तरुणीवर आरोपींनी बलात्कार केला. घटनेनंतर, पीडितेची प्रकृती अतिशय खालावली आणि आरोपी तरुणांनी तिला घराजवळ सोडून फरार झाले. घटनेनंतर, पीडितेने कसंबसं स्वत:ला सावरलं आणि कुटुंबियांना तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत सांगितलं. संबंधित घटनेची माहिती मिळताच, तरुणीच्या भावाने त्वरीत पोलिसांना याची माहिती दिली. सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचताच आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
हे ही वाचा: मुंबई: दिव्यांग तरुणीचं अपहरण अन् बलात्कार! पुरावे मिटवण्यासाठी अंघोळ सुद्धा घातली अन्... आता, कोर्टाचा 'तो' निर्णय
पोलिसांनी दिली माहिती
पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, पीडितेच्या तक्रारीवरून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, तपासादरम्यान आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक केली जाईल आणि त्यांची नावे एफआयआरमध्ये जोडली जातील. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याची पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
पीडितेच्या भावाने तक्रारीत म्हटलं की, त्याची बहीण रविवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. कुटुंबातील सदस्यांनी शोध घेतल्यानंतर ती मध्यरात्री 12:00 च्या सुमारास रडत-रडत घरी परतली. तिची विचारपूस केल्यानंतर तिने सांगितलं की, दोन तरुणांनी तिला बळजबरीने काळ्या रंगाच्या कारमध्ये बसवलं आणि रेल्वे ट्रॅकजवळ नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या भावाने आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली असून त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची विनंती केली.
ADVERTISEMENT











