सरकारी रुग्णालयातील शौचालयात 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Sexully Abused : सरकारी रुग्णालयातील अवारात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली असता, घटनास्थळी एकच खळबळ माजली आहे.

sexually assault

sexually assault

मुंबई तक

23 Oct 2025 (अपडेटेड: 23 Oct 2025, 07:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सरकारी रुग्णालयातील अवारात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

point

आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल 

point

एकूण प्रकरण काय?

Sexully Abused : एका एसएसकेएम सरकारी रुग्णालयातील अवारात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली असता, घटनास्थळी एकच खळबळ माजली आहे. ही घटना कोलकाता येथे बुधवारी दुपारी घडली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : उपचारासाठी तरुणीला क्लिनिकमध्ये बोलावलं, तिला कपडे काढायला सांगितले, जबरदस्ती चुंबन करत नको तिथेच...

आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल 

आरोपी तरुणावर पोक्सो कायदा 2012 अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात गुरुवारी आरोपीला कोलकाता येथील कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी वकील पोलीस कोठडीची मागणी करतील, असे सांगण्यात येत आहे. 

अटक केलेल्या तरुणाला न्यायालयात हजर होईपर्यंत त्याची नेमकी ओळख सांगण्यात पोलिसांनी नकार दर्शवला होता, असे असले तरीही पोलीस सूत्रांनी सांगितलं की, आरोपी हा कोलकाता येथील एनआरएस रुग्णालयात कंत्राटी बेसेसवर काम करतो. याच कारणाने तरुण रुग्णालयात येत होता. 

हे ही वाचा : इंदापूरातील मदनवाडी गावात गर्भवती महिलेचा चादरीत आढळला मृतदेह, हातावर होता 'त्या' नावाचा टॅटू

वॉशरुममध्ये नेले आणि तिथेच तिच्यावर...

पीडितेच्या कुटुंबियांनी दावा केला की, आरोपीने डॉक्टर असल्याचे भासवून पीडितेला रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरबाहेरील वॉशरुममध्ये नेले आणि तिथेच तिच्यावर विनयभंग केला. पीडित तरुणी धक्काबुक्की करत शौचालयातून बाहेर आली आणि तिच्यावर झालेला अत्याचार हा तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर हे प्रकरण देशासमोर आल्याचं सांगण्यात येत आहे.  

    follow whatsapp