Crime News: चोरी आणि दरोड्याच्या घटना वाढत असतानाच दिल्ली पोलिसांनी असंच एक प्रकरण सोडवण्यात मोठे यश मिळवलं आहे. येथील करोल बाग परिसरातून दोन चोरांना अटक करण्यात आली असून त्यापैकी एका तरुणाविरुद्ध 70 हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कामरान आणि समारी अशी आरोपी तरुणांची ओळख समोर आली. या प्रकरणाबाबत सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
गुरुवारी (17 ऑक्टोबर) माता सुंदरी कॉलेजजवळ दोन संशयास्पद व्यक्त फेऱ्या मारत असल्याची दिल्ली पोलिसांनी माहिती देण्यात आली. त्यानंतर, पोलीस तातडीने त्या परिसरात पोहोचले आणि काही वेळातच, त्यांना बाइकवरून दोन तरुण येताना दिसले. पोलिसांनी त्या दोघांनाही अडवलं असता त्यांच्याजवळ एका महिलेची पर्स सापडली. त्यावेळी, पोलिसांना त्या तरुणांवर संशय आला आणि त्यांनी संशयित आरोपींची कठोर चौकशी करण्यास सुरूवात केली. मात्र, त्यावेळी दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लगेच त्या दोघांना पाठलाग केला आणि त्यांना ताब्यात घेतलं.
70 हून अधिक गुन्हे दाखल
आरोपींची कठोर चौकशी केली असता धक्कादायक सत्य उघडकीस आलं. कामरान हा एक सामान्य चोर नसून तो एक अनुभवी गुन्हेगार होता. चोरी, दरोडा आणि जाळपोळ यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्याविरुद्ध, 70 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, जाफराबाद पोलिस स्टेशनमधील एका गुन्ह्यासंदर्भात तो वाँटेड होता, तिथे त्याच्यावर दुकानाला आग लावल्याचा आणि नंतर दुकान मालकाकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होता.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईतील पहिल्या अंडरग्राउंड मेट्रोला प्रवाशांची मोठी पसंती! एकाच आठवड्यात तब्बल 60,000 ते 1,76,000 प्रवासी...
चोरीसाठी दररोज 2000 रुपये देण्याचे आमिष
दुसरा आरोपी तरुण समीर हा गरीब कुटुंबातील असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. याच गोष्टीचा फायदा घेत कामरानने त्याला आपल्या टोळीत सहभागी करुन घेतलं. आरोपी कामरानने समीरला चोरीत मदत करण्यासाठी दररोज 2000 रुपये देण्याचे आमिष दाखवलं आणि त्याला आपल्या कामात सहभागी करुन घेतलं.
हे ही वाचा: गरोदर महिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली, पण अल्ट्रासाउंड करताना डॉक्टरचे अश्लील कृत्य... प्रकरण थेट पोलिसात
प्रकरणाचा तपास सुरू...
दोघेही अशा प्रकारची चोरी करताना हेल्मेट घालूनच बाइकवरून निघायचे आणि गाडीची नंबर प्लेट लपवून ठेवायचे. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की आरोपींना यापूर्वी आयपी इस्टेट पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी चोरीला गेलेली हँडबॅग, मोबाईल फोन आणि इतर अनेक वस्तू जप्त केल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
