'या आयुष्यात भेटला नाहीस, पुढच्या जन्मी मी...', विवाहित महिलेचं 19 वर्षीय प्रियकरासह…

Crime News : या आयष्यात भेटला नाहीस, पुढच्या जन्मी मी तुझीच असेल, विवाहित महिलेची 19 वर्षीय प्रियकरासह आत्महत्या

Mumbai Tak

मुंबई तक

22 Oct 2025 (अपडेटेड: 22 Oct 2025, 09:27 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'या आयष्यात भेटला नाहीस, पुढच्या जन्मी मी तुझीच असेल'

point

विवाहित महिलेची 19 वर्षीय प्रियकरासह आत्महत्या

Crime News: दिवाळीच्या सणामुळे संपूर्ण देश आनंदात न्हाऊन निघाला असताना बिजनौर जिल्ह्यातील हुसैनपूर गावात ह्रदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलंय. विवाहित महिलेचं प्रेम समाजाला मान्य होत नव्हत, त्यामुळे तिने टोकाचा निर्णय घेतला. विवाहित महिलेने तिच्या 19 वर्षीय प्रियकरासह आत्महत्या केली आहे. “या आयष्यात भेटला नाहीस, पुढच्या जन्मी मी तुझीच असेल” हे महिलेचे शेवटचे शब्द ठरले. या घटनेने गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

ही घटना किरतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुसैनपूर गावातील आहे. दीपावलीच्या रात्री सगळीकडे दिवे लावले जात होते, लोक पूजा आणि दिवाळी साजरी करण्यात मग्न होते. त्याच वेळी गावाबाहेरच्या जंगलात एक तरुण आणि एक महिला बेशुद्ध अवस्थेत आढळले. गावकऱ्यांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बिजनौर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं. रात्री दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी प्राथमिक तपासात सांगितले की दोघांनी विषप्राशन केले होते.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांकडून सोलापुरात राष्ट्रवादीला धक्के, अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिलेदार पाठवला

मृत महिलेचं नाव आरती (वय 33) असं असून ती विवाहित आणि दोन मुलांची आई होती. तिचा पती जगमोहन या गावात शेती करत असतो. दुसरा मृत युवक ललित (वय 19) हा त्याच गावचा रहिवासी होता. दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते वारंवार लपूनछपून भेटत असत. या गोष्टींची चर्चा गावात पसरली आणि दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या नात्याला विरोध केला. समाजातील टीका आणि घरच्यांच्या नाराजीनं दोघांना खूप त्रास होत होता.

ही त्यांची पहिली पळवाट नव्हती. 10 ऑक्टोबरला देखील दोघे घरातून पळून गेले होते. त्यावेळी आरतीच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी काही दिवसांत त्यांना शोधून काढले आणि कोर्टात हजर केले. कोर्टात आरतीने आपल्या पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ती परत घरी गेली, पण तरीही ललितशी तिचा संपर्क कायम राहिला. दोघे पुन्हा भेटू लागले आणि समाजाच्या विरोधानंतरही त्यांचं प्रेम प्रकरण थांबलं नाही.

दीपावलीच्या संध्याकाळी दोघांनी पुन्हा एकदा घर सोडलं. गावात उत्सव सुरू असल्याने कोणीही त्यांची गैरहजेरी लक्षात घेतली नाही. रात्री सुमारे आठच्या सुमारास काही गावकऱ्यांनी जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेजवळ त्यांना तडफडताना पाहिलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की त्यांनी विषप्राशन केलं आहे. “आम्हाला जिवंतपणी कोणीही एकत्र येऊ दिलं नाही, आता मरणानंतर भेटू,” असे ते म्हणाले होते. काही तासांतच दोघांचाही मृत्यू झाला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पलंगावर झोपलेल्या पतीला गोळ्या घालून संपवलं, शेजारी झोपलेल्या पत्नीला अंदाजही आला नाही, टॉर्च लावून पाहाताच....

    follow whatsapp