Crime News : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मऊआईमा परिसरात घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. 20 वर्षीय युवकाचं गुप्तांग कापल्याची ही घटना 16ऑक्टोबरच्या रात्री घडली. अधिक धक्कादायक बाब म्हणजे ही अमानवी कृती त्याच्या स्वतःच्या वहिनीने केल्याचं तपासात उघड झालं आहे. कारण फक्त इतकंच – युवकाने वहिनीच्या लहान बहिणीशी लग्न करण्यास नकार दिला होता.
ADVERTISEMENT
घटनेची पार्श्वभूमी
मऊआईमा परिसरातील मलखानपूर गावातील उमेश नावाचा तरुण आणि त्याची वहिनी मंजू हिची लहान बहिण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून ओळख वाढली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि उमेशने लग्नाचं आश्वासनही दिलं होतं. मात्र कुटुंबीयांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी नातेसंबंधातील जवळिकीमुळे या लग्नाला तीव्र विरोध केला.
हे ही वाचा>> 30 वर्ष मुंबईत समुद्राच्या लाटा पाहायला गेलो नव्हतो; कोणत्या पक्षात प्रवेश करणार? रामराजेंनी स्पष्टच सांगितलं
यामुळे उमेशनेही लग्न करण्यास नकार दिला आणि सांगितलं की तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो. या नकारामुळे वहिनी मंजू संतापली. तिच्या बहिणीने उमेशच्या नकारानंतर नैराश्याचा झटका बसल्याने ती गप्प, उदास राहू लागली. बहिणीची अवस्था पाहून मंजूच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली आणि तिने भीषण कृत्याचा निर्णय घेतला.
16 ऑक्टोबरच्या रात्री, जेव्हा उमेश घरात झोपला होता, तेव्हा मंजूने स्वयंपाकघरातून चाकू घेतला आणि त्याच्या खोलीत शिरली. उमेश अविवाहित असल्याने तो वेगळ्या खोलीत झोपत असे. तिथे जाऊन मंजूने सलग चार वेळा चाकूचे वार केले आणि त्यानंतर त्याचा गुप्तांग कापला. उमेश वेदनेने ओरडू लागला, पण तोपर्यंत मंजू पळून गेली होती.
गोंधळ ऐकून उमेशचा भाऊ धावत आला आणि त्याने पाहिलं की खोलीत उमेश रक्ताने माखलेला पडला आहे. जमिनीवर रक्ताचा थारोळा आणि त्याचा कापलेला अवयव दिसत होता. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं आणि पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलीस तपासात या हल्ल्यामागे मंजूचं नाव समोर आलं. चौकशीत समजलं की, तिने बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला आखला होता. पोलीसांनी तिच्या अटकेसाठी मोहिम सुरू केली असून तिची जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
डॉ. गिरीश मिश्रा यांनी सांगितलं की, उमेश वर दीड तास शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो सुरक्षित आहे. मात्र पूर्ण बरा होण्यासाठी त्याला किमान सात ते आठ महिने लागतील. डॉक्टरांनी सांगितलं की योग्य काळजी घेतल्यास त्याचं आयुष्य वाचेल, पण मानसिक आघातातून सावरायला त्याला वेळ लागेल.
परिसरात खळबळ
या विचित्र आणि भयंकर घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नात्यातील मर्यादा ओलांडून सूडाने केलेल्या या कृतीमुळे सामाजिक नात्यांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी मंजूविरुद्ध हत्या प्रयत्नासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
