Crime News: नातेसंबंधांना लाज आणणाऱ्या बऱ्याच धक्कादायक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. दिल्लीतील असंच एका मामी आणि भाच्याचं प्रेम प्रकरण चर्चेचा विषय बनत आहे. येथे एका 2 मुलांच्या आईचं तिच्या भाच्यावरच प्रेम जडलं. प्रकरणातील महिलेचं नाव पूजा असल्याची माहिती आहे. भाच्यावर प्रेम असल्याने पूजा तिच्या पतीपासून वेगळी झाली आणि तिच्या प्रियकरासोबत राहू लागली. पूजाला वाटलं की तिचा भाचा तिच्या पतीपेक्षा तिच्यावर जास्त प्रेम करेल आणि ती त्याच्यासोबत आनंदी राहील. पण आता, त्याच भाच्याने पूजाला धोका दिल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
पूजा मिश्रा हिचं लग्न गाझियाबाद येथील रहिवासी ललित मिश्रा नावाच्या तरुणासोबत झालं होते. त्यांना दोन मुलं होती. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चाललं होते. ललितचा मोठा व्यवसाय सुद्धा होता. अशातच, ललितने त्याचा भाचा आलोकला त्याच्या व्यवसायात मदत करण्यासाठी गाझियाबादला बोलावलं.
मामीचं भाच्यावर प्रेम जडलं
आलोक त्याच्या मामाच्या घरी राहत असताना पूजा आणि तिचा भाचा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. एके दिवशी, ललितला तिच्या पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल कळलं आणि त्याने आलोकला त्याच्या घरातून हाकलून लावलं. मात्र, पूजाचं आलोकवर प्रेम जडलं होतं. आलोकच्या प्रेमात पडून पूजा तिच्या पतीला सोडून त्याच्यासोबत राहण्यासाठी बरेलीला गेली. इतकेच नव्हे तर, प्रियकरासाठी तिने तिच्या दोन्ही मुलांनाही सोडलं.
त्यानंतर, बरेलीमध्ये आलोक ऑटो रिक्षा चालवून त्याच्या आणि त्याची प्रेयसी पूजाचा उदरनिर्वाह करू लागला. दोघेही बरेलीमध्ये सात महिने एकत्र राहिले. पण त्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण होऊ लागले. या वादामुळे दोघांच्याही नात्यात तणाव निर्माण झाला. दरम्यान, आलोक पूजापासून वेगळा झाला आणि तिला सोडून सीतापूरमधील त्याच्या गावी, मढिया येथे परतला.
हे ही वाचा: “माझी पत्नी मला त्रास देते....” तरुणाने व्हिडीओ बनवला अन् थेट ट्रेनखाली उडी... नेमकं काय घडलं?
ब्लेडने मनगट कापलं अन्...
आलोकने पूजाला सोडून दिल्यानंतर ती देखील सीतापूर येथील त्याच्या गावी आली. पूजा पिसावा पोलिस स्टेशन हद्दीतील कुतुब नगर पोलिस स्टेशनमध्ये तिच्या प्रियकराविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेली. पोलिसांनी आलोकला सुद्धा तिथे बोलवलं. पण आलोकने पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की त्याला पूजासोबतचं त्याचं नातं कायमचं संपवायचं आहे. दरम्यान, या मोठ्या धक्क्यामुळे पूजाने पोलीस स्टेशनमध्येच ब्लेडने तिचं मनगट कापलं.
हे ही वाचा: दिराने असं काय केलं की वहिनीला त्याचं गुप्तांगच कापावं लागलं? धक्कादायक खुलासा
त्यानंतर, पोलिसांनी पूजाला तातडीने रुग्णालयात नेलं आणि तिला उपचारासाठी दाखल केलं. पूजा सध्या आउट ऑफ डेंजर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सध्या, हे प्रकरण अजूनही चर्चेचा विषय असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
