Crime News : मुलाचे दु:ख फक्त एक वडीलच समजू शकतो. पण, जेव्हा त्या मुलाचे निधन होते तेव्हा ते दु:ख कल्पनेच्या बाहेर असते. अशातच आता पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांनी अलीकडेच त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूबद्दल आणि कुटुंबाच्या 18 वर्षांच्या संघर्षाबद्दल त्यांच्या भावना स्पष्टपणे मांडलेल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ऐन दिवाळीत वृद्ध महिलेच्या गळ्यावर दिवसाढवळ्या चाकूने वार, घटनास्थळी रक्ताचे वाहिले पाट, पोलिसंही चक्रावले
काय म्हणाले पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा?
मुस्तफा म्हणाला की, हे बघा, मुलाच्या जाण्याचं दु:ख हे फक्त दुसरं तिसरं कोणीही समजू शकत नाही. माझा मुलगा एकुलता एक 35 वर्षांचा होता. सहा-सात दिवस मला एकही फोन आला नाही. ना प्रमुख राजकारण्यांकडून ना अधिकाऱ्यांकडून. मी फक्त माझ्या आठवणींमध्ये आणि धक्क्यात मग्न होता. या काळात, काही लोक माझ्य़ा जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत होते, पण मला भीती वाटत नाही. आता मी माझ्यातील वडील आणि सैनिक जागे केले आहेत, त्यामुळे सत्य उघड होईल.
मुस्तफाने त्याच्या मुलाला गेली 18 वर्षे ड्राग्ज व्यसनाने ग्रासल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. 2006 मध्ये, माझ्या मुलाने शाळेत असताना सॉफ्ट ड्राग्ज वापरण्यास सुरुवात केली. मनातील अॅसिडच्या वापरामुळे त्याचे मन आणि शरीर अधिकच खराब झाले. त्याने अनेकदा सुदारणा करण्याचा प्रयत्नही केला, परंतु मानसिक आणि शारीरिक गुंतागुंत त्याला अनेकदा मागे टाकत असे. त्यानंतर तो म्हणाला की, त्याच्या मुलाच्या मानसिक स्थितीत कधीकधी मानसिक लक्षणे दिसून येत होती, त्याच्या मनात अशा गोष्टी दिसत होत्या, त्या प्रत्यक्षात घडल्या नव्हत्या. ही केवळ ड्रग्ज व्यसनाची मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक संघर्षांचीही एक घटना आहे.
मुस्तफाने कुटुंबात घडलेल्या अनेक धोकादायक आणि दु:खद घटना उघड करण्यात आल्या होत्या. त्याने सांगितलं की, 2019 मध्ये एका खोलीत आग लागली होती. त्याने एकदा त्याच्या सुनेला एका खोलीत बंद करण्यात आले होते. तो वारंवार कर्मचारी आणि कुटुंबाशी हिंसक वृत्ती ठेवत वागू लागला. त्याने स्पष्ट केले की, असे वागूनही कुटुंबाने त्याच्यावर जीवापाड प्रेम करत करुणा दाखवली. या प्रकरणात पोलीस तक्रारी दाखल करण्या आल्या. मुस्तफा म्हणाला की, माझ्या कुटुंबाचे चारित्र्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत.
मुस्तफाने त्याच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे आणि शौर्याचे जाहीरपणे समर्थन करत म्हटलं की, माझी पत्नी ही 25 वर्षांपासून राजकारणात आहे आणि नेहमीच सत्य आणि न्यायासाठी उभे राहायला शिकली आहे. माझ्या मुलीचे आणि सुनेचे चारित्र्य प्रत्येक पालकांसाठी एक आदर्श म्हणून पाहिले जाते. माझ्या मुलाच्या चुका असूनही, आम्ही नेहमीच त्याला समजून घेतलं आणि त्याची काळजी घेतील. मुलगा हा मुलगाच असतो; त्याची कसलीही चूक माफ केली जाते.
मुस्तफा यांनी एसआयटीच्या तपासाचे स्वागत केले आणि म्हणाले की, मी कायदा आणि एकूण तपासणीसाठी सहकार्य करेन. जे सत्य बाहेर येईल ते स्वीकारावे लागेल. जर कोणी खोटेपणा पसरवून माझ्या कुटुंबाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल. माझी मुलगी, पत्नी आणि सुनेचे चारित्र्य शुद्ध आहे आणि या दुनियेनं एकूणच परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : ऐन दिवाळी सणाला पावसाचं सावट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
मुस्तफाने स्पष्ट केलं की, त्याच्या घरी विशेष सुरक्षा आणि पाळत होती. दहा ते वीस पोलीस अधिकारी आणि आठ ते दहा कर्मचारी 24 तास उपस्थित होते. चार महिला कायमस्वरुपी कार्यरत होत्या. प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही लाऊनही त्यांच्या मुलाच्या वागणुकीत कसलाही बदल झाला नाही, याचा अर्थ तो गुन्हेगार होता. आम्ही अनेकदा त्याला समजावून घेण्याचा आणि सुधारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणात मुस्तफा यांनी स्पष्ट केलं की, आमच्याविरुद्ध खोटे आरोप, व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील प्रचार केवळ हे राजकीय खेळ आहेत. कुटुंबाने नेहमीच सत्य, प्रेम आणि कुरुणेचा सामना केला, अजूनही कायद्याच्या बाजूने उभे असल्याचे मुस्तफा म्हणाला.
ADVERTISEMENT
