Crime News: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील रामनगर परिसरात दोन मित्रांनी मिळून मित्राची अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून आरोपींनी पीडित तरुणाच्या छातीत चाकू भोसकून त्याची हत्या केल्याचं त्यात स्पष्टपणे दिसून येत आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतलं असून आशिष चौतमल आणि सुबोध देहाडे अशी आरोपी मित्रांची ओळख समोर आली. तसेच, घटनेतील मृत तरुणाचं नाव विपुल चाबुकस्वार असल्याची माहिती आहे. या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.
ADVERTISEMENT
मित्राच्या छातीवर चाकूने वार...
संबंधित घटना ही दिवाळी सणाच्या दिवशीच म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. खरंतर, मृत विपुल हा दोन्ही मित्रांना म्हणजेच आशिष आणि सुबोध भेटण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर, पीडित तरुण हा मित्रांना भेटण्यासाठी रिक्षाजवळ पोहोचला. त्यावेळी, सुबोध देहाडे नावाचा त्याचा मित्र हा रिक्षामध्ये बसला होता आणि आशिष हा विपुलसोबत रिक्षाच्या बाहेर बोलत होता. अचानक बोलत असताना आशिषने लगेच त्याच्या खिशातून चाकू काढला आणि त्या चाकूने त्याने विपुलच्या छातीवर वार केला. त्यावेळी, विपुल काही वेळातच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा: पती झोपलेला असताना अंगावर उकळतं पाणी अन् अॅसिड फेकलं... ऐन दिवाळीत पत्नीचं पतीसोबत जीवघेणं कृत्य!
पोलिसांचा तपास
मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, प्रकरणातील आरोपींची स्पष्टपणे ओळख पटते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाल्याने तपास आणखी सोपा झाला आणि त्या दृष्टीने प्रकरणाचा पुढील तपास केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा: समोशाच्या पैशांवरून वाद झाला अन् शेतकऱ्याच्या डोक्यात थेट तलवारीने वार... नेमकं प्रकरण काय?
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. खरंतर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित विपुल आणि आरोपी तरुणांचा चेहरा हा स्पष्टपणे दिसून येत आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
