Crime News: एका महिलेने तिच्या पतीच्या गरम पाणी आणि अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित प्रकरण हे गुजरातच्या अहमदाबादमधील सॅटेलाइट परिसरातील असल्याची माहिती आहे. येथे एका 33 वर्षीय फूड डिलिव्हरी कामगारावर त्याच्या 31 वर्षीय पत्नीने गरम पाणी आणि अॅसिड फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंर, पीडित व्यक्तीवर सिव्हिल हॉस्पिटलच्या एसआयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी सॅटेलाइट परिसरातील रहिवासी असलेल्या एका फूड डिलिव्हरी कामगाराच्या घरी झालेल्या घरगुती वादामुळे त्याच्या पत्नीने त्याच्यावर उकळतं पाणी आणि अॅसिड फेकल्याची माहिती अहमदाबाद पोलिसांनी दिली. पीडित व्यक्ती ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या मरणाशी झुंज देत असल्याची माहिती आहे.
विवाहबाह्य संबंधाचा संशय
सॅटेलाईट पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी महिलेला तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि याच कारणामुळे तिने आपल्या पतीवर असा हल्ला केला. घटनेनंतर, पीडित तरुणाला सिव्हिल हॉस्पिटलच्या एसआयसीयू वॉर्डमध्ये गंभीर अवस्थेत उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. त्याच्या पोटात, मांड्या, पाठ, हात आणि गुप्तांगावर गंभीर दुखापत झाली आहे. यासंदर्भात, पीडित व्यक्तीने रुग्णालयाच्या बेडवरून त्याच्या पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: समोशाच्या पैशांवरून वाद झाला अन् शेतकऱ्याच्या डोक्यात थेट तलवारीने वार... नेमकं प्रकरण काय?
तरुणाने दाखल केली तक्रार
घटनेनंतर, आरोपी महिला पळून गेल्याचा आरोप देखील पीडित तरुणाकडून केला जात आहे. दाखल झालेल्या एफआयआरनुसार, पीडित तरुण झोपलेला असताना त्याची पत्नीने हे निर्घृण कृत्य केलं. तरुणाच्या म्हणण्यानुसार, आरोपी महिलेने अचानक तरुणाच्या अंगावरून ब्लँकेट काढलं आणि त्याच्यावर उकळतं पाणी ओतलं. इतकेच नव्हे तर, आरोपी पत्नीने तिच्या पतीवर अंगावर आणि अगदी गुप्तांगावर सुद्धा अॅसिडची बॉटल ओतली.
यापूर्वी सुद्धा बरेच वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी पीडित तरुण आणि आरोपी महिलेचं लग्न झालं असून ते सॅटेलाइट परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. महिलेला आधीपासून एक लग्न झालं असून तिला त्या लग्नापासून सहा वर्षांचा मुलगा आहे. पीडित तरुणाने सुद्धा पहिल्या पत्नीपासून कायदेशीररित्या वेगळं होण्यासाठी घटस्फोट घेतला होता. मात्र, लग्नाच्या काही काळानंतर आरोपी महिलेने तिच्या पतीवर अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय घेण्यास सुरूवात केली. यापूर्वी सुद्धा दोघांचे वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले होते.
हे ही वाचा: भाच्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेनं घर-दार सोडलं! पण, शेवटी त्यानेच धोका दिला अन् पीडितेनं पोलीस स्टेशनमध्येच...
शेजारी मदतीसाठी धावले
आरोपी महिलेच्या या कृत्यानंतर, पीडित तरुणाच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येताच, शेजारी लगेच मदतीसाठी धावले. त्यांनी आपत्कालीन सेवांना फोन केला आणि तरुणाला सोल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितले की पीडितेची प्रकृती गंभीर आहे, कारण त्याच्या शरीराचे अनेक भाग गंभीररित्या भाजले आहेत. सॅटेलाइट पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 124 अंतर्गत अॅसिडने गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
