Crime News : जावईबापूने आपल्या सासऱ्यांकडे आपल्या पत्नीची म्हणजेच त्यांच्या लाडक्या मुलीची तक्रार केली. जावयाने आपली पत्नी ही गेल्या काही महिन्यांपासून काही मुलांसोबत फोनवर बोलत असल्याची त्याने तक्रार केली. जेव्हा सासऱ्याने त्यांच्या मुलीला पाठिंबा देण्यास सुरुवात केली तेव्हा संतापलेल्या जावयाने कसलाही विचार न करता सासऱ्याचीच हत्या केली. या घटनेनं घटनास्थळावरील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ऐन दिवाळीत कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर भीषण अपघात, भाऊबीजेपूर्वी भावासह बहिणीचा चिरडून मृत्यू
नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरण हे मुरारीलाल छाती रुग्णालयातील आहे. तिथे दाखल झालेल्या अनिता देवी या महिलेची काळजी तिचा पती राजकुमार घेत होता. काही दिवसांपूर्वी कोणीतरी राजकुमारची हत्या केली. त्यानंतर जावई मोहित तोमरनेच हत्या घडवून आणली होती, असे समोर आले, त्यानंतर त्याने एका ऋषभ नावाच्या तरुणाला हत्येसाठी 6 लाख रुपये दिले होते. हत्येमागील खरं कारण अद्यापही आता समोर आलं आहे.
माझ्या पत्नीचे लग्नापूर्वी तीन परपुरुषांसोबत प्रेमसंबंध
संबंधित प्रकरणात मोहितने सांगितले की, माझ्या पत्नीचे लग्नापूर्वी तीन इतर परपुरुषांसोबत प्रेमसंबंध होते. यावरून आमच्यात अनेकदा वादंग निर्माण झाला. अनेकदा मला तुरुंगात पाठवण्याची तयारी झाली, हे सर्व बघून मी संतापलो, मला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. त्यांना मारहाण करण्यासाठी एक कंत्राटदार नेमण्यात आला. मी माझ्या पत्नी नम्रतासह माझ्या मेहुण्याला गाडीने चिरडून टाकण्याचा विचार करत होतो, पण मला ताब्यात घेतले.
हे ही वाचा : FB वरून महिलेशी केली मैत्री, अडीच वर्षे केले लैंगिक शोषण, मुलासह नवऱ्यालाही... रायगड हादरलं!
पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा सध्या कोठडीत असून महितने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे त्यांच्यात सतत वादंग निर्माण व्हायचा.
ADVERTISEMENT
