Pune Crime : शिक्षणाचं माहेर घरं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचाच प्रत्यय स्वारगेट परिसरात 22 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत दिसून आला. पोलिसात दिलेल्या जुन्या तक्रारीचा राग मनात ठेवून दोन तरुणांनी एका 23 वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला केला.
ADVERTISEMENT
स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आरोपींनी हातात कोयता घेऊन पीडिताला धमकावत मारहाण केली. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यात आरोपी “डोक्यात मारू का?” असा धमकीवजा प्रश्न विचारताना दिसतात. प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे की, हल्ल्यात पीडिताचे डोकं दगडाने फोडण्यात आले असून तो रक्तबंबाळ अवस्थेत जखमी झाला आहे.
हेही वाचा : भाऊरायाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त कोणता? भाऊबीजेसाठीची शुभ-वेळ जाणून घ्या
स्वारगेट पोलिसांनी आरोपी भिमराव नरसप्पा मानपाढे (वय 26, रा. गुलाबनगर, धनकवडी, पुणे-37) आणि लखन वाघमारे (वय 30, रा. अप्पर बिबवेवाडी, पुणे-37) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा याप्रकरणी आरोप असा आहे की, त्यांनी मिळून सोन्या उर्फ विष्णू लक्ष्मण होसमणी (वय 23, रा. इंदिरानगर, खडडा, गुलटेकडी) या तरुणावर हल्ला केला.
पोलीसांच्या तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी ही घटना “आमची वर्षभरापूर्वी तू पोलिसात तक्रार केली होतीस” या कारणावरून घडवली. वर्षभरापूर्वी पीडितावर होसमणी टोळीने लुटीचा प्रयत्न केला होता आणि त्या वेळी पीडिताने स्वारगेट पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करून टोळीला तुरुंगात पाठवले होते.
तुरुंगातून सुटल्यावर आरोपींनी पुन्हा पीडिताला गुलटेकडी भागात अडवून हल्ला केला. त्यांनी “तू आमची तक्रार केली होती, तुझ्यामुळे आम्ही जेलमध्ये गेलो,” असे म्हणत कोयता दाखवत धमकावले.
घटनेच्या वेळेस फिर्यादी आणि त्याचा मित्र त्या ठिकाणी थांबलेले होते. आरोपी दोघे चारचाकी गाडीतून उतरले. फिर्यादीला शिवीगाळ करून छातीवर थाप मारली. विरोध केल्यानंतर दोघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडिताचा मित्र कृष्णा विजय सोनकांबळे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, तरीही आरोपींनी त्यांनाही मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून, सध्या तपास सुरू आहे. पोलिस प्राथमिक तपास आणि व्हिडिओ पुराव्याच्या आधारावर आरोपींना ओळखत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरने उपचारासाठी तरुणीला कपडे काढायला सांगितले, अन् केलं संतापजनक कृत्य
ADVERTISEMENT
