हॉटेलमध्ये रूम बुक केली अन् फाशी लावून... दिवाळीतच डिलिव्हरी बॉयने उचललं टोकाचं पाऊल!

एका Blinkit (ब्लिंकिट) च्या डिलिव्हरी बॉयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या तरुणाने शनिवारी रात्री हॉटेलमध्ये एक रूम बुक केली होती.

डिलिव्हरी बॉयने उचललं टोकाचं पाऊल!

डिलिव्हरी बॉयने उचललं टोकाचं पाऊल!

मुंबई तक

• 08:00 AM • 23 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेलमध्ये रूम बुक केली अन् गळफास घेत आत्महत्या

point

दिवाळीच्या दिवशी डिलिव्हरी बॉयने उचललं टोकाचं पाऊल!

Crime News: उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी एका Blinkit (ब्लिंकिट) च्या डिलिव्हरी बॉयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या तरुणाने शनिवारी रात्री हॉटेलमध्ये एक रूम बुक केली होती. रविवारी सकाळी बराच वेळ खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर, दरवाजाचं कुलूप तोडून आत पाहिल्यानंतर त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी आता मृतदेह ताब्यात घेतला असून आवश्यक ती कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

येथील लाईन बाजार परिसरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. हुसैनाबाद येथील रहिवासी प्रियंक सोनकर हा ब्लिंकिटमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. शनिवारी रात्री त्याने हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती. प्रियांक त्या रात्री तिथे झोपायला गेला पण रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तो उठलाच नाही. हॉटेलच्या वेटरने नाश्ता देण्यासाठी दार ठोठावलं तरी तो त्याने उघडला नाही.

हे ही वाचा: चोरीचा संशयातून बेदम मारहाण करत मुंबईतील तरुणाचा जीव घेतला! आईने थेट पोलिसात धाव घेतली अन्...

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह  

वेटरने बऱ्याचदा वेटरने दार ठोठावल्यानंतर सुद्धा प्रियंकने खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यावेळी हॉटेलच्या मॅनेजरने पोलिसांना कळवलं. पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा तोडल्यानंतर खोलीत प्रियंकचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी खोलीची कसून झडती घेतली पण कोणतीही सुसाईड नोट वगैरे सापडली नाही.

हे ही वाचा: कंपनीकडून दिवाळीसाठी केवळ 1,100 रुपये बोनस! संतप्त कर्मचाऱ्यांनी टोल उघडला अन् 10 हजार गाड्या फ्री मध्येच...

कुटुंबियांना दिली माहिती  

संबंधित तरुणाने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. प्रियंक दोन दिवसांपूर्वी घराबाहेर गेल्याचं घरच्या सदस्यांनी सांगितलं. तरुणाच्या मृत्यूनंतर, पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. जौनपूर पोलिसांनी याबाबतीत माहिती देताना सांगितलं की मृत तरुणाने एका हॉटेलमध्ये खोली बुक केली होती आणि तो रात्री तिथे राहिला होता. सकाळी दरवाजा उघडला नाही तेव्हा पोलिसांच्या उपस्थितीत कुलूप तोडण्यात आलं. तरुणाचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कुटुंबाला माहिती देण्यात आली आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून आवश्यक ती कारवाई केली जात आहे.

    follow whatsapp