'मी खोलीत बंद आहे आणि..." महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस पोहोचले पण, आत पाहिलं तर काय...

व्हिडीओमध्ये संबंधित महिला म्हणाली की, "मी माझ्या खोलीत बंद आहे आणि माझ्या सासरची मंडळी माझ्या खोलीच्या बाहेर उभी आहेत." हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचताच ते आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले.

 महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस पोहोचले पण...

महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस पोहोचले पण...

मुंबई तक

• 07:00 AM • 23 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोशल मीडियावर महिलेचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाली 'मी खोलीत बंद आहे..."

point

व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस पोहोचले पण...

Viral Story: सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्ये संबंधित महिला म्हणाली की, "मी माझ्या खोलीत बंद आहे आणि माझ्या सासरची मंडळी माझ्या खोलीच्या बाहेर उभी आहेत." हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचताच ते आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी, त्या महिलेला खोलीतून बाहेर काढण्यात आलं. मात्र, यादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. संबंधित महिला ही मध्य प्रदेशातील इंदौरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला 

खरंतर, त्या महिलेने स्वत:ला खोलीत बंद करून घेतल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. पतीसोबत झालेल्या वादामुळे तिने असा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचं ठरवलं. हे प्रकरण लसूडिया पोलीस स्टेशन हद्दीतील शांती निकेतन परिसरातील असल्याची माहिती समोर आली. येथे राहणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये महिला तिच्या मुलांसोबत खोलीत बंद असून तिच्या सासरचे लोक तिला मारहाण करण्यासाठी खोलीच्या बाहेर थांबल्याचं संबंधित महिलेनं सांगितलं.

हे ही वाचा: लिव्ह-इन-पार्टनरकडून गर्भवती महिलेची निर्घृण हत्या! पीडितेवर चाकूने हल्ला केला अन् अखेर पतीने सुद्धा...

व्हिडीओमध्ये मदतीची याचना करताना दिसली

या व्हिडीओमध्ये ती महिला मदतीची याचना करताना दिसली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने खोलीचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये महिलेशी बोलणं केलं. पोलिसांनी तिची चौकशी केल्यानंतर एक वेगळीच बाब समोर आली. खरंतर, त्या महिलेचे तिच्या सासरच्या लोकांसोबत वाद सुरू होते. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आणखी एक मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार... कसा असेल रूट?

दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होते...

संबंधित महिलेवर यापूर्वी सुद्धा लसूडिया पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल आहे. तिने गाझियाबादमध्ये तिच्या पतीच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासानुसार, ती महिला बऱ्याच दिवसांपासून गाझियाबादमध्ये राहत होती. पण, अचानक ती इंदौरमध्ये आली आणि तिने घरात स्वत:ला बंद करून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा खोलीबाहेर कोणीच नव्हतं आणि खोली बाहेरून बंद सुद्धा नव्हती. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी महिलेला लसूडिया पोलीस स्टेशनमध्ये आणलं. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि तिच्या पतीमध्ये कौटुंबिक वाद सुरू होते आणि याच कारणामुळे तिने व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचं ठरवलं. 

    follow whatsapp