विधवा महिलेसोबत लग्न, नंतर पहिल्या पतीच्या मृत्यूवरुन टोमणे अन् शेवटी सायको पतीने इस्त्रीने...

Crime News : विधवा महिलेसोबत लग्न, नंतर पहिल्या पतीच्या मृत्यूवरुन टोमणे अन् शेवटी सायको पतीने इस्त्रीने...

आरोपी पिता गिरफ्तार.(Photo: Representational)

आरोपी पिता गिरफ्तार.(Photo: Representational)

मुंबई तक

23 Oct 2025 (अपडेटेड: 23 Oct 2025, 02:47 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधवा महिलेसोबत लग्न, नंतर पहिल्या पतीच्या मृत्यूवरुन टोमणे

point

अन् शेवटी सायको पतीने इस्त्रीने जाळलं

Crime News : देशात महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे बनले असले तरी महिलांवर होणारे अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत. मध्य प्रदेशातील जबलपूरमधून समोर आलेल्या एका घटनेनं पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित केला आहे की, शेवटी महिलांना घरगुती हिंसा आणि मानसिक छळ किती काळ सहन करावा लागणार आहे?

हे वाचलं का?

ही संपूर्ण घटना माढोताल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रैंगवां गावातील आहे. येथे 37 वर्षीय शिल्पी तिवारी नावाच्या महिलेने माढोताल पोलीस ठाण्यात हजर राहून आपल्या पती अरविंद तिवारी, दीर आशुतोष तिवारी आणि जाऊ शांतिबाई यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

शिल्पी तिवारी यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा पहिला विवाह बडैयाखेडा पाटनचे रहिवासी महेंद्र तिवारी यांच्याशी झाला होता. मात्र, सुमारे सहा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं. पहिल्या विवाहातून त्यांना 15 वर्षांचा एक मुलगा आहे. पतीच्या मृत्यूनंतर जुलै 2025 मध्ये त्यांनी अरविंद तिवारीशी दुसरा विवाह केला.

हेही वाचा : पोलिसात तक्रार दिल्याचा राग, पुण्यात युवकावर दोघांकडून कोयत्याने वार

सासरच्यांकडून पहिल्या पतीच्या मृत्यूचा टोमणा

तक्रारीत पीडितेने सांगितले की, सासरचे लोक तिला वारंवार पहिल्या पतीच्या मृत्यूबद्दल टोमणे मारत असत. दीपावलीच्या दिवशी दुपारी घरात वाद झाला असता पती अरविंदनं भांडणाच्या दरम्यान गरम इस्त्रीने शिल्पीला भाजले. एवढंच नव्हे, तर तिचा दीर आशुतोष आणि जाऊ शांतिबाई यांनी अरविंदला उचकावले आणि नंतर तिघांनी मिळून शिल्पीला मारहाण केली. माढोताल पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश दोहरे यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवर तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

जोपर्यंत समाजाची विचारसरणी बदलत नाही तोपर्यंत…

ही घटना केवळ जबलपूरपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण देशाच्या सामाजिक रचनेवर प्रश्नचिन्ह उभं करते. अनेक महिलांना दररोज अपमान, हिंसा आणि टोमण्यांचा सामना करतात. कायदा कितीही कठोर असला तरी, जोपर्यंत समाजाची विचारसरणी बदलत नाही आणि महिला स्वतःच्या अधिकारांविषयी जागृत आणि सबळ होत नाहीत, तोपर्यंत अशा घटना घडत राहतील. शिल्पी तिवारी यांचा प्रसंग आपल्याला आठवण करून देतो की, घरगुती हिंसेच्या मुळाशी मानसिक छळ असतो आणि त्याला वेळेत विरोध न केल्यास तो शारीरिक अत्याचाराच्या स्वरूपात प्रकट होतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

दिवाळीत बीड हादरलं! फटाके फोडताना झाला स्फोट, 6 वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला मोठी इजा, नेमकं काय घडलं?

    follow whatsapp