पोलिसात तक्रार दिल्याचा राग, पुण्यात युवकावर दोघांकडून कोयत्याने वार
Pune Crime : पोलिसात तक्रार दिल्याचा राग, पुण्यात युवकावर दोघांकडून कोयत्याने वार
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पोलिसात तक्रार दिल्याचा राग

पुण्यात युवकावर दोघांकडून कोयत्याने वार
Pune Crime : शिक्षणाचं माहेर घरं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचाच प्रत्यय स्वारगेट परिसरात 22 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत दिसून आला. पोलिसात दिलेल्या जुन्या तक्रारीचा राग मनात ठेवून दोन तरुणांनी एका 23 वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला केला.
स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आरोपींनी हातात कोयता घेऊन पीडिताला धमकावत मारहाण केली. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यात आरोपी “डोक्यात मारू का?” असा धमकीवजा प्रश्न विचारताना दिसतात. प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे की, हल्ल्यात पीडिताचे डोकं दगडाने फोडण्यात आले असून तो रक्तबंबाळ अवस्थेत जखमी झाला आहे.
हेही वाचा : भाऊरायाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त कोणता? भाऊबीजेसाठीची शुभ-वेळ जाणून घ्या
स्वारगेट पोलिसांनी आरोपी भिमराव नरसप्पा मानपाढे (वय 26, रा. गुलाबनगर, धनकवडी, पुणे-37) आणि लखन वाघमारे (वय 30, रा. अप्पर बिबवेवाडी, पुणे-37) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा याप्रकरणी आरोप असा आहे की, त्यांनी मिळून सोन्या उर्फ विष्णू लक्ष्मण होसमणी (वय 23, रा. इंदिरानगर, खडडा, गुलटेकडी) या तरुणावर हल्ला केला.