सचिन, द्रविडला जमलं नाही, ते रोहित शर्माने करुन दाखवलं, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला
rohit sharma becomes first indian to score 1000 odi runs in australia against australia : सचिन, द्रविडला जमलं नाही, ते रोहित शर्माने करुन दाखवलं, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सचिन, द्रविडला जमलं नाही, ते रोहित शर्माने करुन दाखवलं
अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय
rohit sharma becomes first indian to score 1000 odi runs in australia against australia : भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याने आणखी एक मोठा इतिहास रचलाय. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1000 वनडे धावा पूर्ण केल्या आहेत. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने हा विक्रम केलाय. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मातीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1000 धावा करून इतिहास रचला.
दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताला सुरुवातीला मोठा झटका बसला. शुभमन गिल केवळ 9 धावा करून बाद झाला, तर विराट कोहली शून्यावर माघारी परतला. सलग दुसऱ्यांदा कोहली शून्यावर आउट झाला. त्यामुळे भारतीय संघ सुरुवातीच्या षटकांमध्येच अडचणीत सापडलाय. मात्र, रोहितने भारताचा डाव सावरलाय.
मागील सामन्यात रोहित शर्माने फक्त 8 धावा केल्या होत्या. त्या सामन्यानंतर त्यांच्या ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 998 वनडे धावा झाल्या होत्या. नवा विक्रम करण्यासाठी त्याला फक्त 2 धावा गरजेच्या होत्या, आणि आजच्या सामन्यात त्याने त्या पूर्ण करून इतिहास रचला. तो पहिला भारतीय ठरला आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाच्या मातीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १००० वनडे धावा केल्या. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड़, सौरव गांगुली यांसारखे दिग्गजही हे कधी साध्य करू शकले नाहीत.
सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 25 वनडे सामन्यांत 740 धावा केल्या आहेत. एमएस धोनीने 20 सामन्यांत 684 धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहेत, ज्याने 20 सामन्यांत 802 धावा केल्या आहेत. विराट कोहली एडिलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडेत शून्यावर बाद झाला.










