शिक्षिकेला शाळेत घुसून संपवले, 21 वर्षीय तरुणानं केले 27 वार, नेमकं कारण काय?

मुंबई तक

04 Aug 2026 (अपडेटेड: 04 Aug 2026, 09:42 AM)

फरीदाबादमधील एका खाजगी शाळेत एका शिक्षिकेची भोसकून हत्या करण्यात आली आणि हा संपूर्ण हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पोलिसांनी 21 वर्षीय आरोपीला दोन तासांच्या आत अटक केली; पीडितेने छळ आणि विनयभंगाची तक्रार केल्यामुळे सूडबुद्धीने ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिक्षिकेला शाळेच्या गेटवरच संपवले

point

21 वर्षीय तरुणाचं भयानक कृत्य

point

नेमकं कारण काय?

Crime News : एका खाजगी शाळेत 29 वर्षीय महिला शिक्षिकेची दिवसाढवळ्या अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'सरस्वती सीनियर सेकंडरी स्कूल'मध्ये कार्यरत असलेल्या संध्या या नेहमीप्रमाणे सकाळी 9:30 वाजता शाळेत पोहोचल्या होत्या. त्यावेळी अमित (वय 21) नावाचा तरुण तोंडाला पांढरा रुमाल बांधून तेथे आला आणि त्याने संध्या यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. कर्मचारी निरोप देण्यासाठी गेले असता, अमितने मुख्य प्रवेशद्वारावरच संध्या यांच्यावर हल्ला चढवला. त्याने त्यांना ओढत नेऊन चाकुने तब्बल 27 वार केले. तिच्या चेहरा, मान, छाती आणि पोटावर गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हरियाणातील फरिदाबादमधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

सीसीटीव्हीत काय दिसलं?

या संपूर्ण घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. फुटेजमध्ये तोंडाला रुमाल बांधलेला आरोपी अनेक मिनिटे शाळा परिसरात बिनधास्त वावरताना दिसत आहे. शाळेत कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याने आणि अनोळखी व्यक्तीला कुणीही न अडवल्याने शाळा प्रशासनाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओमध्ये संध्या जीवाच्या आकांताने पळताना आणि आरोपी त्यांचा पाठलाग करून वार करताना स्पष्ट दिसत आहे. ती जमिनीवर कोसळल्यानंतरही तो तिच्यावर सपासप वार करत राहिला.

हे ही वाचा : अभिजीत दीपकेंचा लाखो डॉलरचा शिक्षण खर्च चौकशीत सापडणार?

'माझ्यावर चाकूने...'

घटनेदरम्यान शाळेचे प्रशासक तेजपाल यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांच्यावरही चाकू उगारल्याने त्यांना मागे राहावे लागले. तेजपाल यांनी सांगितले की, "मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्यावरच चाकू घेऊन चालून आला. मी हत्यार शोधेपर्यंत त्याने अनेक वार केले आणि तो बाहेर पळाला." हल्ल्यानंतर आरोपी नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलवरून फरार झाला. संध्या यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हे ही वाचा : 'राजकीय करिअर तुझं...' मुंडेंवर घणाघात; जरांगेंनी आंदोलनाचा प्लॅनही सांगितला

आधी जाहीर माफी, नंतर 27 वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित आणि संध्या यांची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. संध्याचा त्याच्याशी बोलण्यास विरोध असतानाही तो सातत्याने तिचा पाठलाग करून छळ करत होता. संध्याने काही दिवसांपूर्वीच त्याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार नोंदवली होती, ज्यानंतर आरोपीने जाहीरपणे माफी मागितली होती. तसेच तिने पुन्हा पोलिसांत जाण्याची धमकी दिल्याने, याच रागातून सूड उगवण्यासाठी त्याने ही हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी सेक्टर 58 पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी घटनेच्या दोन तासांच्या आत अमितला अटक केली आहे. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.