Chandrapur Crime News : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या भीषण घटना थांबयाचं नाव घेत नाहीयेत. आज पुन्हा एका घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांत वाघाच्या हल्ल्यात 8 जणांचा बळी गेला असून, यामध्ये पाच महिलांचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या घटनांमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
ADVERTISEMENT
मारूती शेंडेंच्या पत्नीसमोरच वाघाने त्यांचे लचके तोडले
नागभीडमध्ये असणाऱ्या वढोणा गावात आज वाघानं हल्ला केला. गावातील 63 वर्षीय मारुती शेंडे हे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी आपल्या पत्नीसह जंगलात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर अचानक हल्ला केला. मारुती यांच्या पत्नीच्या डोळ्यांसमोर ही भयंकर घटना घडली. घाबरलेल्या पत्नीने गावात धाव घेऊन ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, तर वन विभागाची टीमही तातडीने दाखल झाली. गंभीर जखमी अवस्थेत मारुती शेंडे यांना सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा >> शिवराजला मारणाऱ्या समाधान मुंडेला बेदम मारहाण? नव्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?
दुसऱ्या घटनेत मूलमध्ये असणाऱ्या भादुर्णी गावातील 70 वर्षीय ऋषी पेंदोर यांचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ऋषी हे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जंगलात गेले होते. मात्र, ते परत न आल्यानं शोधाशोध केली असता त्यांचा अर्धवट खाल्लेला जखमी अवस्थेतील मृतदेह जंगलात आढळून आला.
वन विभागाने ग्रामस्थांना जंगलात जाण्यास मज्जाव केला असतानाही, उपजीविकेसाठी अनेकांना जंगलात जाण्याशिवाय पर्याय नाही. विशेष म्हणजे, सिंदेवाही काही दिवसांपूर्वीच वाघाच्या मादीला आणि तिच्या पिल्लाला पिंजऱ्यात बंद करण्यात आलं होतं. तरीही हल्ले सुरूच आहेत.
हे ही वाचा >> Beed : रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक माहिती समोर
गेल्या चार महिन्यांत अशा हल्ल्यांमध्ये 19 जणांचा बळी गेला आहे. यामुळे माणसं आणि हिंस्त्रश्वापदांमधील संघर्षाचा हा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्यास जंगलालगतच्या गावांमध्ये भीती आणि मृत्यूचं सावट कायम राहील.
ADVERTISEMENT
