हात-पाय बांधून मारहाण, सोल्डरींग मशिनने चटके! 25 लाखाची मागणी करत सुनेला छळणाऱ्या 6 जणांना...

महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या सासरच्या मंडळींनी तिचे हात-पाय बांधून तिला सोल्डरिंग मशीनने जाळले आणि तिच्या माहेरहून 25 लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला.

Mumbai Tak

मुंबई तक

03 Jun 2025 (अपडेटेड: 03 Jun 2025, 04:26 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हुंड्यासाठी सुनांचा छळ अजूनही सुरूच!

point

संभाजीनगरच्या चौक्यामध्ये सुनेला मशिनने चटके दिलेे

point

हात-पाय बांधून करण्यात आला सुनेचा छळ

छत्रपति संभाजीनगर : पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे हुंड्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. कायद्यामध्ये तरतुदी केल्यानंतरही अनेक कुटुंब अजूनही सुनांना छळत असल्याचं समोर येतंय. त्यातच आता फुलंब्री तालुक्यातील चौका गावात राहणाऱ्या एका सुनेसोबतही तसाच प्रकार घडलाय. चौकामध्ये राहणाऱ्या हिना शेख या महिलेवर सासरच्या मंडळींकडून अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती, सासू, नणंद आणि कुटुंबातील इतर तीन सदस्यांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>काकीनं पुतण्याला संपवलं, मृतदेहाचे तुकडे सिमेंटच्या... पुन्हा 'मेरठ'सारखीच घटना, अश्लील फोटोवरुन...

महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या सासरच्या मंडळींनी तिचे हात-पाय बांधून तिला सोल्डरिंग मशीनने जाळले आणि तिच्या माहेरहून 25 लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे आठ वर्षांपूर्वी लग्न झालं असून, तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. ती गेल्या काही काळापासून सासरच्या छळाला बळी पडत होती. 

सुनेला माहेरहून 25 लाख रुपये आणण्यासाठी तिला सतत त्रास दिला जात होता. या छळादरम्यान तिचे हात-पायांना चटके देण्यात आले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. सासरच्या मंडळींविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा >>नवऱ्याला सोडून दिलं; परपुरूषाला केलं जवळ, त्याच पुरूषानं आधी महिलेचे केलं लैंगिक शोषण, नंतर तिच्याच मुलीवर...

पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड़ यांनी सांगितलं की, पीडित महिलेने यापूर्वी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. पण ती बराच काळ छळ सहन करत होती. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन स्वतंत्र पथकं स्थापन करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.

    follow whatsapp