पतीकडून सतत छळ अन् बळजबरीने शारीरिक संबंध, पत्नीने प्रियकरासोबत मिळून केलं भलतंच...

प्रकरणाचा तपास केला असता पत्नीने आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करून त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, संबंधित महिलेची चौकशी केली असता त्यामध्ये बरेच धक्कादायक खुलासे उघडकीस आले आहेत.

पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला कट

पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला कट

मुंबई तक

• 07:00 AM • 11 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीकडून सतत छळ अन् बळजबरीने शारीरिक संबंध...

point

अखेर, पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला कट

point

शेवटी घडली भयानक घटना

Crime News: हरियाणाच्या सोनीपत येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पोलिसांना एका तरुणाचा गार्डनमध्ये मृतदेह आढळून आला. प्रकरणाचा तपास केला असता पत्नीने आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करून त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, संबंधित महिलेची चौकशी केली असता त्यामध्ये बरेच धक्कादायक खुलासे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपी पत्नी सरिताला अटक केल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

पत्नीला मारहाण अन् बळजबरीने शारीरिक संबंध... 

2012 मध्ये सरिताचा रामकिशन नावाच्या तरुणासोबत विवाह झाला होता. खरं तर, रामकिशन हा सरिताहून 8 वर्षांचा मोठा असल्याने त्याला त्यांच्या नात्याबाबत सतत काळजी लागून राहिली होती. तो सहसा सरिताला कोणत्या दुसऱ्या पुरुषासोबत बोलू देत नव्हता, कारण आपली पत्नी आपल्याला सोडून तर जाणार नाही ना, अशी त्याला सतत चिंता वाटायची. इतकेच नव्हे तर, रामकिशन त्याच्या पत्नीला मारहाण देखील करायचा. 5 डिसेंबरच्या रात्री सरिता आणि रामकिशन यांच्यामध्ये असंच भांडण झालं. त्यावेळी, रामकिशनने नशेत सरितासोबत संबंध प्रस्थापित केले आणि तिला मारहाण सुद्धा केली. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता अ‍ॅक्वा लाइनवर मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या; प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार गर्दीची चिंताच नाही...

गुप्तांगावर वार करून हत्या.. 

पतीच्या कृत्याला वैतागून अखेर सरिताने त्याचा काटा काढायचं ठरवलं. महिलेने याबाबत सांगितलं की, तिचा पती नेहमी गांजाच्या नशेत असायचा आणि तो बऱ्याचदा पॉर्न व्हिडीओ बघून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. याच कारणामुळे, तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या करण्याचा प्लॅन आखला. सोमवारी रात्री रामकिशन झोपल्यानंतर, सरिताने तिच्या प्रियकराला बोलवलं. त्यानंतर, प्रियकराने रामकिशनचं उशीने तोंड दाबलं आणि सरिताने पतीचं गुप्तांग दाबलं. यामुळे, त्याचा जागीच मृत्यू झाला. आता पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. 

हे ही वाचा: पुणे: गुडघ्यांचा आजार सहन होईना, पोलीस उपनिरीक्षकाने आयुष्य संपवलं; सुसाईड नोटमध्ये सगळंच सांगितलं

धक्कादायक बाब म्हणजे, प्रकरणाचा तपास सुरू असताना राम किशन, सरिता आणि तिच्या प्रियकराचे गुन्हेगारी रेकॉर्ड सापडले. राम किशनवर चोरी आणि ड्रग्जच्या गैरवापराचे गुन्हे होते, तर सरितावर खंडणीचे आरोप होते. तसेच, रामकिशन आणि महिलेचा प्रियकर यांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. खरं तर, तुरुंगात असतानाच दोघांची एकमेकांसोबत भेट झाली होती. संबंधित महिलेचा प्रियकर दोन महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता आणि त्यानंतर, सरिता आणि त्याचे प्रेमसंबंध सुरू झाले. 

    follow whatsapp