Crime News: मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील रैपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या महिलेच्या प्रेमसंबंधामुळे तिचं कुटुंब उद्धवस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याच घरात राहणाऱ्या भाडेकरूसोबत पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचं कळताच पतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी, पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT
पत्नीचे फेरीवाल्यासोबत जुळले प्रेमसंबंध...
पोलिसांच्या तपासात समोर आलं की जून-जुलै 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या कासिम नावाच्या एका व्यक्तीने मृत अमृतलाल चौधरीच्या घरी एक खोली भाड्याने घेतली होती. कासिम त्या परिसरात फेरीवाला म्हणून काम करत होता. या काळात अमृतलालची पत्नी आणि कासिममध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
हे ही वाचा: पुण्यात खळबळ! तरुणीचा मॅसेज अन् डोंगरात भेटण्यासाठी गेला पण, जागीच संपवलं; हत्येपूर्वी शेवटची इच्छा विचारली अन्...
नैराश्यात विष प्राशन करून पतीची आत्महत्या
जेव्हा पती अमृतलालला आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल कळलं तेव्हा तो प्रचंड संतापला. त्यावेळी त्याने आपल्या पत्नीला कासिमविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितलं, परंतु तिने नकार दिला आणि तिच्या प्रियकराची बाजू घेतली. या विश्वासघातामुळे आणि सामाजिक बदनामीच्या भीतीने अमृतलालने नैराश्यात विष प्राशन केलं आणि जबलपूरच्या रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: समलैंगिक संबंधाच्या नादात महाराष्ट्रातून थेट आग्र्याला पोहोचला, पण... 66 वर्षीय वृद्धाची चक्रावून टाकणारी कहाणी!
पोलिसांचा तपास
आत्महत्या करण्यापूर्वी पीडित अमृतलालने एक सुसाईड नोट लिहिली आणि त्यामध्ये त्याने त्याच्या आत्महत्येचं कारण तसेच पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल लिहिलं होतं. सुसाईड नोटच्या तपासाच्या आधारे, रैपुरा पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिचा प्रियकर कासिम विरुद्ध BNS च्या कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध तातडीने कारवाई करत आरोपी पत्नीला अटक करून तिला न्यायालयात हजर केलं आणि तिथून तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. फरार प्रियकर कासीमचा सध्या शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT











