Crime News: वाशिमच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. येथे महिलेचा भयानक अवस्थेत मृतदेह आढळल्याचं वृत्त आहे. मृत महिलेचं डोकं पूर्णपणे ठेचण्यात आलं होतं. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
45 ते 50 वर्षीय महिलेचा मृतदेह
काल म्हणजेच 9 जानेवारी रोजी पोलिसांना रेल्वे स्टेशन परिसरात भयानक अवस्थेत एका महिलेचा मृतदहे आढळल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळता, वाशिम रेल्वे पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आला. एका ट्रकजवळ संबंधित महिलेचा मृतदेह आढळून आला होता आणि हा मृतदेह 45 ते 50 वर्षीय महिलेचा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हे ही वाचा: जालना : मामीच्या मदतीने मामाचा आपल्याच भाचीवर लैंगिक अत्याचार, तब्बल दोन वर्षांपासून अल्पवयीन पीडितेसोबत...
अस्ताव्यस्त आणि फाटलेल्या अवस्थेतील कपडे
तसेच, एका मोठ्या दगडाने महिलेचं डोकं ठेचण्यात आल्याने हे हत्येचं प्रकरण असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. इतकेच नव्हे तर, महिलेच्या शरीरावरील कपडे देखील अस्ताव्यस्त आणि फाटलेल्या अवस्थेत होते, त्यामुळे मृत महिलेसोबत जबरदस्ती करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा: जीजूने पटवली मेहुण्याचीच पत्नी, अनैतिक संबंधाची भनक लागताच मेहुणा चवताळला अन् भयानक हत्याकांड
पोलिसांनी दिली माहिती
घटनास्थळावरी तपासादरम्यान, वाशिम पोलिसांनी आरोपींबद्दल कोणताही पुरावा मिळवण्यासाठी वाशिम पोलिसांनी घटनास्थळी एक श्वान देखील आणलं, परंतु त्यातून कोणताचा सुगावा हाती लागला नाही. अद्याप मृत महिलेची ओळख समोर आली नसून त्याचा तपास सुरू आहे. तसेच, महिलेच्या हातावर 'छाया मोहन' असं नाव गोंदवल्याची माहिती आहे. वाशिम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











