जीजूने पटवली मेहुण्याचीच पत्नी, अनैतिक संबंधाची भनक लागताच मेहुणा चवताळला अन् भयानक हत्याकांड

एका तरुणाने आपल्याच दाजीची निर्घृण हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. खरं तर, हे एक सुनियोजित हत्याकांड असून संजय नावाच्या तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

मेहुणा चवताळला अन् भयानक हत्याकांड

मेहुणा चवताळला अन् भयानक हत्याकांड

मुंबई तक

• 10:25 AM • 10 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

जीजूने पटवली मेहुण्याचीच पत्नी

point

अनैतिक संबंधाची भनक लागताच मेहुणा चवताळला

point

विवाहबाह्य प्रेमसंबंधातून भयानक हत्याकांड

Crime News: अनैतिक तसेच विवाहबाह्य संबंधातून बरेच धक्कादायक हत्याकांड घडत असल्याचं समोर येत असतं. झारखंडच्या रांचीमधून असंच एक भयानक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एका तरुणाने आपल्याच दाजीची निर्घृण हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. खरं तर, हे एक सुनियोजित हत्याकांड असून संजय उरांव नावाच्या तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. 

हे वाचलं का?

याप्रकरणी, आरोपी मेहुणा, त्याची पत्नी आणि इतर दोन साथीदारांनी मिळून पीडित तरुणाची हत्या केली आणि नंतर मृतदेह अरगोडा पोलीस स्टेशन हद्दीतील अशोक नगरच्या गेट नंबर-01 जवळील रेल्वे ट्रॅकच्या कडेला झुडुपांमध्ये फेकून देण्यात आला. या हत्येला रेल्वे अपघाताचं स्वरूप दाखवण्यासाठी ही योजना आखण्यात आली होती. पण, शेवटी 11 महिन्यांचा दीर्घ तपास आणि टेक्निकल पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणलं. 

हे ही वाचा: ...अखेर सुप्रिया सुळे अन् अजित पवार एकत्र, पुणे अन् पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जाहिरनाम्याचं प्रकाशन

मृत तरुण संजय उरांव याच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. यामध्ये, विनोद उरांव (मृताचा मेहुणा), राजमणि देवी (मुख्य आरोपी विनोदची पत्नी), अमरदीप खालखो आणि अनुप उरांव यांचा समावेश आहे. हे आरोपी झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील बिशुनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या आरोपींकडून स्मार्टफोन जप्त केले आहेत. 

मेहुण्याच्या पत्नीसोबत दाजीचे अनैतिक संबंध... 

10 फेब्रुवारी 2025 रोजी पोलिसांना अरगोडा पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे ट्रॅकच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. प्राथमिकदृष्ट्या, हे रेल्वे अपघाताचं प्रकरण दिसून आलं आणि त्यानंतर, अरगोडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 29/2025 नोंदवून घटनेचा तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान, संजय उरांव अशी मृताची ओळख समोर आली. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, संजयचे त्याच्या मेहुणीची रत्नी राजमणी देवीशी प्रेमसंबंध असल्याचं उघडकीस आली. आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल विनोदला कळताच घरात वाद सुरू झाले. 

हे ही वाचा: 'आता तुम्ही म्हातारे झाले, तरी मुंबईत...', CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

चाकूने वार करून निर्घृण हत्या 

अखेर, पत्नी आणि दाजीच्या प्रेमसंबंधाला वैतागून त्याने संजयच्या हत्येची योजना आखली. यामध्ये, आरोपीसोबत त्याची पत्नी राजमणी देवी सुद्धा सहभागी होती. ठरल्याप्रमाणे, विनोद त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून संजयला फूस लावून रांची येथे घेऊन आला. तिथे अशोक नगरजवळील रेल्वे ट्रॅकवर नेऊन आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार केले आणि त्याची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर, आरोपींनी पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह झुडुपांमध्ये फेकून दिला. 

    follow whatsapp