Crime News: चोरीचं एक विचित्र आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पहाटेच्या सुमारास, एक जोडपं चोरी करण्याच्या उद्देशाने एका कॅफेमध्ये घुसलं. पण नंतर, या जोडप्याने चोरी करण्याचं विसरून एकमेकांसोबत रोमान्स करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्या दोघांनी आधी एकमेकांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर रेस्टॉरंटमधून चोरी केली.
ADVERTISEMENT
पहाटेच्या सुमारास कपल कॅफेमध्ये घुसलं अन्...
मात्र, चोरी करणाऱ्या जोडप्याचं सगळं कृत्य CCTV फुटेज मध्ये कैद होणार, याची त्यांनी कल्पनाच नव्हती. संबंधित प्रकरण हे अमेरिकेतील एरिजोना येथील असल्याची माहिती आहे. गेल्या शनिवारी पहाटेच्या सुमारास, गुलाबा फुलांच्या सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'Mon Cheri' नावाच्या कॅफेमध्ये एका पुरूष आणि महिलेने चोरी केल्याचं सांगितलं जात आहे. कॅफे मालकाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही आरोपींनी पहाटे 3.50 वाजताच्या सुमारास रेस्टॉरंटमध्ये घुसले. दोघांनी आपली ओळख लपवण्यासाठी हुडी घातली होती.
हे ही वाचा: किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला! केवळ 10 रुपयांसाठी केली हत्या, मृताचे वडील म्हणाले की...
शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर चोरी...
पण, त्यांचं ते कृत्य हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालं. कॅफेमध्ये प्रवेश करताच ते जोडपं थेट कॅफेमधील फुलांनी सजवलेल्या परिसरात गेलं. त्यानंतर त्यांनी तिथेच बसण्याच्या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यांच्या या कृत्यामुळे कॅफेमधील गुलाब सर्वत्र पसरले. त्यानंतर, ते चोरी करण्यासाठी आत गेले. सकाळी रेस्टॉरंटचे मालक लेक्सी कॅलिस्कन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तेथील दृश्य पाहून त्यांना रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याचं लक्षात आलं. कॅफे मालकाच्या म्हणण्यानुसार, पर्ण स्टँड फुटलेला आणि रेस्टॉरंटमधील सर्वत्र विखुरलेल्या होत्या.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई एअरपोर्टवर प्रवाशाच्या बॅगेत आढळले सिल्व्हरी गिबन! आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करी?
कॅफेमध्ये नेमकं काय घडलं?
या जोडप्याने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आत प्रवेश केला. त्यांनी जवळपास 450 डॉलर्स रोख, एक आयफोन आणि रमची एक बॉटल चोरली. यावरून ते व्यावसायिक किंवा सवयीचे चोर नसून त्यांनी संधी मिळताच रेस्टॉरंटमधील वस्तू चोरल्याचं दिसून येत आहे. चोरी करतेवेळी, त्यांनी कॅफेच्या दोन दरवाजांना सुद्धा नुकसान पोहोचवल्याची माहिती आहे. रेस्टॉरंटमध्ये घुसताना त्या दोघांनी चेहऱ्यावर मास्क लावलं होतं, पण नंतर आरोपी ते मास्क काढून टाकतात. त्यामुळे, सीटीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसतो. घटनेतील दोन्ही चोरांचा शोध घेतला जात असून ते अद्याप पोलिसांना सापडले नाहीत.
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक

 
 









