Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका भावाने आपल्या बहिणीचा गळा दाबून तिची निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर आरोपीने मृतदेह पोत्यात भरून तो गावापासून दूर एका शेतात फेकून दिला. पीडितेच्या कुटुंबियांना आपली मुलगी घरात सापडली नसल्याने त्यांनी तिचा तपास सुरू केला. त्यानंतर, पोलिसांना सुद्धा मुलगी बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली. अखेर पोलिसांच्या तपासादरम्यान, पीडित तरुणीच्या भावानेच काही पैशांसाठी तिची हत्या केल्याचं समोर आलं. कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे, प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
हत्येनंतर मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून दिला
27 ऑक्टोबर रोजी छठ पूजा करण्यासाठी पीडितेची आई तिच्या मैत्रिणींसोबत नदीच्या किनारी गेली होती. त्यावेळी, पीडिता नीलम घरीच होती. दरम्यान, तिचा मोठा भाऊ रामाशीष घरी पोहोचला आणि त्याने आपल्या बहिणीसोबत भांडण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर, त्यांचा वाद टोकाला पोहोचला आणि त्याने त्याच्या बहिणीचा ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर, आरोपी भावाने मृतदेह पोत्यात भरला आणि तो बाईकवरून नेऊन गावापासून बऱ्याच किलोमीटर दूर एका ऊसाच्या शेतात फेकून दिला.
आरोपीने केला गुन्हा कबूल
काही वेळानंतर कुटुंबीय घरी पोहोचले आणि त्यांना घरात कुठेच नीलम दिसली नाही. त्यानंतर, त्यांना मुलीची चिंता वाटू लागली आणि त्यांनी पीडितेचा शोध घेण्यास सुरूवात केली. मुलगी कुठेच न सापडल्याने पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली. पीडितेच्या भावाची चौकशी केली असता त्याने त्याची बहिणीबद्दल काही माहिती नसल्याचं सांगितलं. परंतु, गावकऱ्यांनी त्याला बाईकवरून भरलेलं पोतं घेऊन घरातून निघताना पाहिलं. त्यानंतर, पोलिसांनी घराच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर, पोलिसांनी रामाशीषला जाब विचारला असता त्याने पोत्यातून गहू घेऊन जात असल्याचं सांगितलं. मात्र, कठोर चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांसमोर त्याचा गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा: "एअरगनने त्याने आधी फायर केलं..." रोहित आर्या केससंबंधी मुंबई पोलिसांची माहिती... स्टुडिओच्या आत नेमकं काय घडलं?
जमिनीच्या पैशांवरून वाद
चौकशीदरम्यान आरोपीने सांगितलं की, तो आपल्या पत्नी आणि मुलांसोबत वेगळं राहतो. काही दिवसांपूर्वी, रस्त्याच्या कडेला असलेल्या कुटुंबाच्या जमिनीसाठी 5 लाख रुपये मोबदला मिळाला होता, त्यापैकी आरोपी आपल्या वडिलांकडून 2 लाख रुपयांची मागणी करत होता, वडिलांनी मुलाला पैसे देण्यास नकार दिला. नीलमच्या लग्नात पैसे खर्च झाल्याचं वडिलांनी रामाशीषला सांगितलं. याच कारणावरून आरोपी संतापला आणि त्याने संधी साधून त्याची बहीण नीलमची हत्या केली.
हे ही वाचा: बहिणीच्या अफेअरबद्दल कळालं अन् रुग्णालयात जाऊन थेट डॉक्टरवर हल्ला! मुंबईच्या केईएम रुग्णालयातील धक्कादायक घटना
या हत्येच्या प्रकरणात रामाशीषसोबत त्याची पत्नी सुद्धा सहभागी असल्याचं सांगण्यात येत आहे. आता पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये नीलमचं लग्न होणार होतं आणि सगळे कुटुंबीय लग्नाच्या तयारीत होते. प्रकरणातील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. आता प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 
 
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक

 
 









