crime news : महिला सफाई कर्मचाऱ्यांची कपडे काढून त्यांच्या मासिक पाळीची पुष्टी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यपालांच्या भेटीदरम्यान महर्षी दयानंद विद्यापीठात घडलेल्या या लज्जास्पद घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. या प्रकरणात आता दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हा धक्कादायक प्रकार हरयाणा राज्यातील रोहतक येथे उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात दरड कोसळली, सनरुफ तोडून महिलेच्या डोक्यात दगड पडला, महिलेचा दुर्दैवी अंत
सुपरव्हायझरने महिलांच्या मासिक पाळीचे पुरावे मागितले
संबंधित प्रकरणात पीडित महिलेच्या माहितीनुसार, पीडित महिला या कामावर उशिरा आल्या होत्या. त्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी मासिक पाळी असल्याचं कारण सांगितलं. तेव्हा त्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुपरव्हायझरने त्यांच्या पुरावे मागितले, या संदर्भात कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले की, आमच्या मासिक पाळीवर शंका उपस्थित केली. आमचे सॅनिटरी पॅड काढायला लावले. त्यांचे फोटो काढून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी विरोध दर्शवल्यास त्यांना शिवीगाळही करण्यात आली आणि कामावरून काढून टाकण्यात आल्याचा महिलांनी आरोप केला आहे.
सुपरव्हायझर निलंबित
संबंधित प्रकरण समोर येताच विद्यार्थिनींनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विद्यापीठाच्या व्यवस्थानेनं आरोपी सुपरव्हायझरला निलंबित करत चौकशी आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई दुसऱ्या अधिकाऱ्याच्या आदेशाने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. महिला कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ आणि पोलीस प्रशासनाकडून तात्काळ कायदेशीर आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.
हे ही वाचा : बहिणीची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह पोत्यात भरून दिवसाढवळ्या शेतात फेकला अन्... भावाचा भयानक कट
या प्रकरणात महर्षि दयानंद विद्यापीठाच्या जनसंपर्क संचालकांनी सांगितलं की, विद्यापीठ कॅम्पसमधील घटनेबाबतच्या तक्रारीच्या संदर्भात, कुलगुरू प्रा. राजबीर सिंह यांनी तात्काळपणे कारवाईचे आदेश जारी केलेले आहेत.
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक

 
 









