Crime News: किरकोळ वादातून एका तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही दिल्लीच्या मंगोलीपुरी परिसरात घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून निखिल उर्फ तोतला आणि नरेश उर्फ गुल्ली अशी त्यांची नावे समोर आली आहे.
ADVERTISEMENT
वादातून चाकूने केला हल्ला...
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेतील मृत तरुणाचं नाव विकास असल्याचं समोर आलं आहे. तीन दिवसांपूर्वी विकास यादव उर्फ छोटू याचा आरोपीसोबत एका गोष्टीवरून किरकोळ वाद झाला होता. याच वादामुळे दोघांनी बदला घेण्याचं ठरवलं. घटनेच्या दिवशी, विकास त्याच्या घराजवळील गल्लीतून जात असताना आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विकास गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी आरोपी तरुणाला लगेच ई-रिक्षातून संजय गांधी मेमोरिअल रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केल्यानंतर सुद्धा विकासचा जीव वाचला नाही. उपचारादरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई एअरपोर्टवर प्रवाशाच्या बॅगेत आढळले सिल्व्हरी गिबन! आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करी?
10 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला
विकासचे वडील विजय यादव यांच्या म्हणण्यानुसार, हत्येपूर्वी आरोपींनी विकासकडे 10 रुपये मागितले होते आणि हे पीडित तरुणाने त्याच्या वडिलांना सांगितलं होतं. मात्र, विकासने आरोपी तरुणांना पैसे देण्यास नकार दिला. याच कारणामुळे आरोपी संतापले आणि हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. त्यानंतर, आरोपींनी अचानक चाकू काढून विकासच्या पोटात वार केले.
हे ही वाचा: बहिणीच्या अफेअरबद्दल कळालं अन् रुग्णालयात जाऊन थेट डॉक्टरवर हल्ला! मुंबईच्या केईएम रुग्णालयातील धक्कादायक घटना
यापूर्वी सुद्धा आरोपीवर गुन्हा दाखल
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या तपासादरम्यान, नरेश यापूर्वी सुद्धा एनडीपीएस म्हणजेच अंमली पदार्थ संबंधित प्रकरणात तुरुंगात गेला होता. तसेच, स्थानिकांच्या मते, आरोपी निखिल आणि नरेश हे परिसरातील अतिशय उद्धट आणि खोडकर मुलं आहेत. त्याने यापूर्वी एका तरुणाला ब्लेडने जखमी केलं होतं, परंतु भीतीपोटी किंवा इतरांच्या दबावामुळे याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक

 
 









