डॉक्टर नर्सला शामक औषध देऊन फोटो काढायचा, नंतर हॉटेलवर नेऊन... पीडितेशी लज्जास्पद कृत्य

Crime News : एका खासगी रुग्णालयात नर्सशी डॉक्टरने वाईट कृत्य केले. नंतर पीडितेचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. गेली तीन वर्षे पीडितेला विविध शहरांमधील हॉटेलमध्ये नेत तिचे शोषण केले आणि गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास जबरदस्ती केली.

crime new

crime new

मुंबई तक

• 08:00 PM • 29 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

खासगी रुग्णालयात नर्सशी डॉक्टरने वाईट कृत्य केले

point

पीडितेचे फोटो काढून केलं ब्लॅकमेल

point

तीन वर्षांपासून डॉक्टरांचा सुरु होता खेळ

Crime News : एका खासगी रुग्णालयात नर्सशी डॉक्टरने वाईट कृत्य केले. नंतर पीडितेचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. गेली तीन वर्षे पीडितेला विविध शहरांमधील हॉटेलमध्ये नेत तिचे शोषण केले आणि गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास जबरदस्ती केली. ही घटना उत्तर प्रदेशातील संभळमधील मोरादाबादच्या कुंडरकी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. या घटनेनं घटनास्थळी एकच खळबळ उडाल्याची माहिती समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अमरावती : तरुणीला पाहून पाच जणांमध्ये जागा झाला राक्षस, तिच्यावर जबरदस्ती करत जंगलात नेत नको तेच...

डॉक्टरने पीडितेला शामक औषध देऊन बेशुद्ध केले..

घडलेल्या घटनेनुसार, पीडितेनं 7 नोव्हेंबर 2022 रोजी नर्सिंगची नोकरी सुरु केली होती. ती रुग्णालयाच्या वरच्या खोलीत राहत होती. 15 डिसेंबर 2022 रोजी तिची प्रकृती अचानकपणे गंभीर झाली. संबंधित प्रकरणात असा आरोप की, डॉक्टरने तिला शामक औषध दिले, ज्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत पडली आणि त्याने तिचे फोटो काढले. दुसऱ्या दिवशी, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केलं. त्याने तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. 

नर्सने केलेल्या आरोपात काय? 

एफआरआयनुसार, नर्सने केलेल्या आरोपात सांगितलं की, आरोपी डॉक्टरने तिला ब्लॅकमेल करून तीन वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने 2 डिसेंबर 2025 रोजी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गर्भनिरोधक गोळ्या देण्यास भाग पाडले. नंतर डॉक्टरने व्हिडिओ देखील व्हायरल केला. पीडितेचा आरोप असा की, डॉक्टरने तिला नैनिताल, हल्द्वानी, बरेली आणि रामपूर येथील हॉटेल्समध्ये घेऊन गेला, जिथे तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. 

हे ही वाचा : जिच्यावर विश्वास ठेवला, तिनेच पाठीत खंजीर खुपसला; मोलकरणीने मालकीणीला का संपवलं?

पीडितेनं सांगितलं की, तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. तिच्या आईने रुग्णालयातील डॉक्टर आणि तिच्या वडिलांकडे तक्रार दाखल केली, नंतर त्यांनी तिला शिवीगाळ केली.  संभळ कोतवाली पोलिसांनी आरोपी डॉक्टर आणि त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.