Crime News : तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शरीरसंबंध ठेवले, नंतर लग्नपत्रिका छापल्यानंतर पीडित तरुणीशी विवाह करण्यास नकार दिला. तरुणाने लग्नास नकार दिल्याचे कारण देखील समोर आले आहे. जातीचे कारण सांगून त्याने लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला, तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात घडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जिच्यावर विश्वास ठेवला, तिनेच पाठीत खंजीर खुपसला; मोलकरणीने मालकीणीला का संपवलं?
तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सतत केले लैंगिक अत्याचार
शहाडोल जिल्ह्यातील बुधर पोलीस ठाणे परिसरातील कान्हा चेलानी नावाच्या तरुणाने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शोषण केले, पण लग्नाची वेळ आल्यानंतर तरुणाने तिला लग्नास नकार दिला. जातीचे कारण सांगून तरुणाने पीडितेशी संबंध तोडल्याचं सांगितलं. पीडितेनं आरोप केला की, आरोपी कान्हा चेलानीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढळे आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वाईट कृत्य केले.
जातीचे कारण देऊन लग्नास नकार
लग्नाची तारीख 14 फेब्रुवारी 2026 अशी निश्चित केली होती. परंतु शेवटच्या क्षणी आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी जातीचे कारण देऊन लग्नास नकार दिला. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हा चेलानीला अटक केली, तसेच त्याचा भाऊ आशिष याला सुरुवातीलाच तुरूंगात टाकण्यात आले.
हे ही वाचा : तरुण गर्लफ्रेंडला भेटायला गावात आला, ग्रामस्थांनी विजेच्या खांबाला बांधून उघडा करून मारला
बुधर पोलीस ठाण्याचे प्रभारी विनय सिंह यांनी माहिती दिली की, 10 फेब्रुवारी रोजी पीडिता पोलीस ठाण्यात आली आणि लग्नाचे आमिष दाखवून आपले शारीरिक शोषण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात आरोपीच्या भावाला यापू्र्वीच अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवले.
ADVERTISEMENT











