थोरल्या बहिणीला बॉयफ्रेंडसोबत शेतात पकडले, नंतर धाकट्या बहिणीसोबत घडलं भयंकर

मुंबई तक

28 Mar 2026 (अपडेटेड: 28 Mar 2026, 04:09 PM)

धाकट्या बहिणीने थोरल्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत शेतात आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. यामुळे घाबरलेल्या थोरल्या बहिणीने आणि प्रियकराने मिळून धाकट्या बहिणीची हत्या केली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

थोरल्या बहिणीला बॉयफ्रेंडसोबत शेतात पकडले

point

नंतर धाकट्या बहिणीसोबत घडलं भयंकर

Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मोठ्या बहिणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने 11 वर्षांच्या सख्या लहान बहिणीची निर्घृण हत्या केली. केवळ आपले प्रेमप्रकरण उघड होईल या भीतीने या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले. अनुष्का असे या मृत बालिकेचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील ही घटना आहे. 

हे वाचलं का?

बहिणीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले

पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय काजलचे शेजारच्या गावातील शिवम (20 वर्ष) नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या दोघांची ओळख दोन महिन्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. काजलच्या वडिलांना या प्रकरणाची कुणकुण लागली होती, ज्यामुळे त्यांनी काजलचा मोबाईलही तोडला होता. मात्र, वडिलांचा विरोध झुगारून काजल आणि शिवम चोरून भेटत असत. घटनेच्या दिवशी अनुष्का काही कामानिमित्त शेतात गेली असता, तिने काजल आणि शिवमला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले.

हे ही वाचा : बारामतीच्या महिलेचा कर्नाटकात मर्डर, जोडीने निघाले होते गाणगापूरला, वाटेत नवऱ्यासोबत बिनसले अन्..

बिंग फुटण्याच्या भीतीने हत्या

अनुष्काने ही बाब घरी वडिलांना सांगणार असल्याचे म्हटल्यामुळे काजल आणि शिवम घाबरले. आपले बिंग फुटेल आणि वडिलांच्या रागाला सामोरे जावे लागेल, या भीतीने त्यांनी अनुष्काचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर काजलने अतिशय शातिरपणे वागत घरात अनुष्का बेपत्ता असल्याचे नाटक केले. इतकेच नाही तर पोलिसांसमोर ढसाढसा रडून ती स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करत होती, ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

हे ही वाचा : आरोपीने 8 वर्षाच्या मुलीची केली हत्या, नंतर मृतदेह पिठाच्या डब्यात भरला अन् पुढे...

जबाबात विसंगतीमुळे सापडली

मात्र, पोलिसांना काजलच्या जबाबातील विसंगतीमुळे संशय आला. पोलिसांनी अधिक कडक चौकशी केली असता काजल आणि शिवमने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या हत्याकांडाचा छडा लावून दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. एका सख्या बहिणीने आपल्या प्रेमासाठी लहान बहिणीचा बळी घेतल्यामुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.