डॉक्टरने चोरुन काढले नर्सचे आक्षेपार्ह फोटो अन् त्यानंतर तब्बल तीन वर्ष नर्ससोबत घडलं भयानक

मुंबई तक

• 01:06 PM • 29 Mar 2026

एका खाजगी दवाखान्यातील नर्सवर डॉक्टरने तीन वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरने गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध केले आणि तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. या फोटोंच्या सहाय्याने ब्लॅकमेल करत वेगवेगळ्या लॉजवर नेत अत्याचार केले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डॉक्टरने चोरुन काढले नर्सचे आक्षेपार्ह फोटो अन्..

point

तब्बल तीन वर्ष नर्ससोबत घडलं भयानक

Crime News : एका नर्सवर डॉक्टरने तब्बल तीन वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, ती एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती आणि तिथेच वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत राहत होती. 7 नोव्हेंबर 2022 रोजी तिने नोकरी सुरू केली होती, परंतु अवघ्या काही दिवसांतच हा छळाचा प्रकार सुरू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टर आणि त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील ही घटना आहे. 

हे वाचलं का?

गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले अन्..

मिळालेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबर 2022 रोजी नर्सची प्रकृती खालावली असताना, आरोपी डॉक्टरने तिला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. या अवस्थेत तिचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. फोटो व्हायरल करण्याची आणि नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन आरोपीने तीन वर्षांपासून तिचे शोषण केले. 2 डिसेंबर 2025 रोजी देखील त्याने पीडितेवर अत्याचार करून तिला गर्भनिरोधक गोळ्या खाण्यास भाग पाडले. तसेच, त्याचे व्हिडीओ बनवून तिला सतत दहशतीखाली ठेवले.

हे ही वाचा : पत्नीचा मर्डर केल्याने वडील तुरुंगात; ज्याच्याकडे आश्रयासाठी गेली त्या मामानेच केला भाचीवर बलात्कार

लॉजवर नेऊन अत्याचार

पीडितेने आरोप केला आहे की, आरोपी डॉक्टरने तिला नैनीताल, हल्द्वानी, बरेली आणि रामपूर येथील विविध लॉजमध्ये नेऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा पीडितेने या त्रासाबाबत आपल्या आईला सांगितले, तेव्हा तिच्या आईने रुग्णालयात जाऊन संबंधित डॉक्टर आणि त्याच्या वडिलांकडे तक्रार केली. मात्र, आरोपीच्या वडिलांनी सहकार्य करण्याऐवजी उलट पीडितेच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. अखेर कोणताही मार्ग न उरल्याने पीडितेने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली.

हे ही वाचा : 15 दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडसोबत कोर्टात लव्ह मॅरेज; पण लगेच आयुष्य का संपवलं? सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

डॉक्टरवर एफआयआर

संभलचे अप्पर पोलीस अधीक्षक कुलदीप सिंह यांनी सांगितले की, पीडित नर्सच्या तक्रारीच्या आधारे संभल सदर कोतवाली पोलिसांनी डॉक्टर आणि त्याच्या वडिलांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे. रुग्णालयातील ज्या खोलीत पीडित महिला राहत होती, त्याच ठिकाणी हे गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, पुराव्यांच्या आधारे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.