Crime News : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या एका खोलीत 13 वर्षीय मुलीवर सामहिक अत्याचार करण्यात आला. तसेच आरोपी हा 17 वर्षीय अल्पवयीन असून त्याच्या इतर चार साथीदारांचा यात समावेश होता. या प्रकरणात स्थानिकांनी पाचही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिलं. संबंधित प्रकरण उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील आशियाना पोलीस ठाणे परिसरातील आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड : अंबाजोगाईत भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चाकाखाली चिरडलं, भीषण अपघातात बँक अधिकाऱ्याचा अंत
दरम्यान, पीडितेचे आई-वडील हे उपजिवीकेसाठी घराबाहेर पडून काम करायचे. एक दिवशी आईची तब्येत बिघडल्याने तिच्याऐवजी मुलगी लोकांच्या घरी धुणी-भांडी करण्यासाठी गेली होती. रात्री 8:30 वाजता काम आटोपून ती घरी परतत होती. रात्री अचानकपणे वादळ आलं आणि ती आडोशासाठी एका निर्माणाधीन इमारतीत गेली.
पीडितेचे हातपाय बांधून केले लैंगिक शोषण
त्याच ठिकाणी 17 वर्षीय मुख्य आरोपी आपल्या चार मित्रांसोबतच होता. अशातच आरोपींनी पीडितेचे हातपाय बांधले, तिला मारहाण केली आणि नंतर तिचे लैंगिक शोषण केले. मुलगी अद्यापही घरी कशी येईना, यानंतर कुटुंबियांनी शोध सुरु ठेवला. वाटेत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीतून त्यांना किंचाळण्याचा आवाज आला. कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली असता, मुलगी हतबल परिस्थितीत बांधलेल्या अवस्थेत अडकून पडली होती.
कुटुंबियांनी आरडाओरड केली असता, लोक जमा झाले
अशातच, दोघांनी छतावरून उडी मारली आणि ते जखमी झालेल्या अवस्थेतून पळून गेले. यानंतर कुटुंबियांनी आरडाओरड केली असता. जवळचे लोक जमा झाले आणि त्यांनी पाचही जणांना घेरत पकडलं. स्थानिकांनी तात्काळपणे पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. आशियाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाचही आरोपींना ताब्यात घेतले. या दुर्दैवी घटनेनंतर पीडितेला रुग्णालयात दाखल केले.
हे ही वाचा : तरुण महिलांची वाळवत टाकलेली अंतर्वस्त्रे चोरायचा, तेच वस्त्र परिधान करून कॅमेऱ्यासमोर अश्लील...
संबंधित प्रकरणात फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुरावे गोळा केले. या प्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींची चौकशी सुरु केली. तसेच संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT











