Crime News : उत्तर प्रदेशातील बिलासपुरमध्ये मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगण्यात येत आहे की, बिलासपूर येथील एका गावात तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून एका 5 वर्षाच्या मुलीवर एका वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने या कृत्याला सीक्रेट गेम असं नाव दिलं आहे आणि पीडित मुलीने याबाबतची माहिती कुटुंबियांना दिली आणि प्रकरण समोर आले. पीडितेच्या आईने प्रकरणाची गंभीरता ओळखून पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दारूच्या नशेत बोगस डॉक्टर, You Tube वर व्हिडिओ बघून केलं ऑपरेशन, नंतर रुग्णाचा दुर्दैवी अंत
चिमुरडी घरमालकाच्या अल्पवयीन मुलासोबत खेळायची
पीडितेच्या आईने सांगितलं की, ती उत्तराखंडच्या सीमेवरील असलेल्या एका हॉटेलजवळ भाडेतत्वावर घर घेऊन राहत होती. तिची चिमुरडी ही घरमालकाच्या अल्पवयीन मुलासोबत खेळायची. काही काळापूर्वी, मुलीने आईला निष्पापपणे सांगितलं की, घरमालकाचा मुलगा तिच्यासोबत खेळ खेळायचा. खेळता खेळता तो नाहीतेच काम करायचा.
ही बातमी ऐकून मुलीची आईला खूपच दुःखी झाली होती. तिने तिच्या पतीला सांगितलं, ज्याने घरमालकाला तिच्या मुलाच्या कृत्याबाबत माहिती देण्यात आली. घलमालकाने मुलाला विचारपूस केली असता, तेव्हा त्याने आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला होता. घरमालकाने मुलीच्या पालकांना आश्वासन दिले होते, तो त्यांच्या मुलाला घराबाहेर पाठवेल. तथापि, असे झाले नाही आणि आरोपीला घरी राहताना पाहून पीडितेची आई निराश झाली होती.
मुलीवर तब्बल एका वर्षांपासून लैंगिक शोषण
जेव्हा कुटुंबाला प्रकरणाचे गांभीर्य कळाले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. मुलीवर तब्बल एका वर्षांपासून लैंगिक शोषण सुरु होतं. परिणामी 30 ऑक्टोबर रोजी, पीडितेच्या आईने तिचे घर सोडून गावात भाडेतत्वावर राहण्याचा निर्णय घेतला. नंतचर ती थेट अधीक्षकांकडे गेली आणि नंतर न्यायाची मागणी केली.
हे ही वाचा : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूकडून घटस्फोटाची मागणी, हनीमूनच्या रात्री नवऱ्याचं... दोन्ही कुटुंब हादरले
कोतवाली प्रभारी निरीक्षक बलवान सिंह म्हणाले की, पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यांनुसार, पीडितेच्या आईने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुलीविरुद्ध बीएनएस कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला योग्य वैद्यकीय तपासणीसाठी वन स्टॉप सेंटरमध्ये पाठवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली आणि या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT











