80 लाखांच्या सोन्यावर डोळा, वृद्धाची हत्या.., सिमरनने आत्याच्या नवऱ्याला संपवलं

मुंबई तक

02 Sep 2026 (अपडेटेड: 02 Sep 2026, 11:20 AM)

Crime News : 80 लाखांच्या सोन्यासाठी तरुणीने रचला आत्याच्या नवऱ्याचा खून! प्रियकर आणि साथीदारांच्या मदतीने घडली खळबळजनक घटना

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सिमरनचा जीम ट्रेनर प्रियकर अन् आत्याच्या नवऱ्याची हत्या

point

नेमकं काय घडलं?

Crime News : नवी दिल्लीतील रोहिणी सेक्टर 3 मध्ये एका वृद्ध व्यक्तीच्या खूनाचा उलगडा झाला आहे. 80 लाखांच्या सोन्याच्या लालचेतून हा प्रकार घडला आहे. मृताच्या नातेवाईकानेच प्रियकराच्या मदतीने हा कट रचला होता. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : शौचालयाची खिडकी तोडली अन्... हत्या, लूट, चोरीच्या अल्पवयीन आरोपींमुळे नागपूरमध्ये खळबळ

80 लाखांच्या सोन्यासाठी सिमरने रचला कट 

राकेश खन्ना असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिमरन, चिराग, पारस आणि हिमांशु यांना अटक केली आहे. हिमांशु हा जिमचा मालक असून तो सिमरनचा प्रेमी आहे. सिमरन ही राकेश खन्ना यांच्या मेहुण्याची मुलगी आहे. या प्रकरणात सिमरननेच खूनाचा कट रचला असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : रात्री घराबाहेर पडली अन् अचानक गायब! बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाने खळबळ

घरात शिरून राकेश खन्ना यांची हत्या

नियोजनानुसार सिमरनने आत्या आणि घरातील इतर सदस्यांना जत्रा दाखवण्याच्या बहाण्याने घराबाहेर पाठवले होते. राकेश खन्ना घरात एकटे असताना सिमरनने घराचे सेंट्रल लॉक उघडून दिले. त्यानंतर चिराग आणि पारस यांनी घरात शिरून राकेश खन्ना यांची हत्या केली. या दरम्यान सिमरन आणि हिमांशु हे दोघे सुरक्षेसाठी घराखालीच उभे होते.

80 लाखांचा फ्लॅट विकला अन् खरेदी केले होते सोने 

राकेश खन्ना यांनी काही दिवसांपूर्वीच 80 लाखांचा फ्लॅट विकला होता. मिळालेल्या पैशातून त्यांनी सोने खरेदी केले होते. हेच सोने लांबवण्यासाठी हा खून करण्यात आला. मात्र आरोपींच्या हाती केवळ दीड लाखांचे दागिने लागले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून सर्व आरोपींना गजाआड केले आहे.