आठवडाभर गॅरेजमधून नजर ठेवली, खिडकीतून पाहायचा, नर्ससोबत मेकॅनिकचं भयंकर कृत्य

मुंबई तक

01 Sep 2026 (अपडेटेड: 01 Sep 2026, 03:40 PM)

Hyderabad nurse rape murder case : हैदराबादच्या पहाडीशरीफ परिसरात नर्सच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी बिहारमधील बाइक मेकॅनिकला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात आरोपी गेल्या महिनाभरापासून नर्सच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचे समोर आले आहे.

Hyderabad nurse rape murder case

Hyderabad nurse rape murder case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आठवडाभर गॅरेजमधून नजर ठेवली

point

खिडकीतून पाहायचा, नर्ससोबत मेकॅनिकचं भयंकर कृत्य

Hyderabad nurse rape murder case : नर्सवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बिहारमधील एका बाइक मेकॅनिकला सोमवारी अटक केली. आरोपी गेल्या जवळपास महिनाभरापासून संबंधित नर्सच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. नर्स ज्या खोलीत राहत होती, त्या खोलीच्या मागील बाजूस एक गॅरेज होते. तेथील खिडकीतून तो तिच्यावर नजर ठेवायचा.  2023 मध्ये कामासाठी आरोपी हैदराबादमध्ये आला होता. पोलिसांच्या तपासानुसार, सुमारे महिनाभरापूर्वी त्याने खिडकीतून नर्सला पाहिले आणि त्यानंतर तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

हे वाचलं का?

हेही वाचा : माणुसकीला काळिमा! तीन महिन्यांच्या चिमुकलीचा पुरलेला मृतदेह काढला बाहेर

नर्सने प्रतिकार केल्यानंतर मॅकेनिकने केली हत्या 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्स झोपेत असताना आरोपी खिडकीतून तिच्या खोलीत शिरला. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. नर्सने प्रतिकार केल्यानंतर आरोपीने तिचा गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर तो त्याच खिडकीतून बाहेर पडला. मात्र, नर्सच्या मृत्यूपूर्वी किंवा मृत्यूनंतर लैंगिक अत्याचार झाला होता, हे अद्याप निश्चितपणे स्पष्ट झालेले नाही. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराच्या वेळी नर्स बेशुद्ध होती. “त्यावेळी पीडितेचा मृत्यू झाला होता की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही,” असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : अकोला : उपचाराच्या बहाण्याने तरुणीची छेड काढली, लज्जास्पद वर्तन करणाऱ्या डॉक्टरला अटक

केसांचे नमुने आणि इतर फॉरेन्सिक पुरावे जप्त 

पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्हा करताना आरोपी दारु पिलेला होता. घटनेनंतर तो पुन्हा गॅरेजमध्ये गेला आणि झोपला. सुरुवातीला त्याने हत्येतील सहभाग नाकारला होता. मात्र, तपासादरम्यान पोलिसांनी मोबाइल फोन टॉवर डेटा आणि इतर पुरावे सापडले. त्यानंतर आरोपीची पुन्हा चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून केसांचे नमुने आणि इतर फॉरेन्सिक पुरावेही पोलिसांनी जप्त केले आहेत. पीडितेचा मोबाइल फोन, हेडफोनसह तिच्या इतर वस्तू घटनास्थळी तशाच आढळून आल्या. त्यामुळे चोरी हा हत्येमागील उद्देश नसल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे.

नर्सशी संपर्क होत नसल्याने तिच्या मैत्रिणीला संशय आला. ती काही जणांसह तिच्या खोलीत गेली. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून आत प्रवेश केला आणि नर्स मृतावस्थेत आढळली. सुरुवातीला या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी बलात्काराशी संबंधित कलमे तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील तरतुदीही लागू केल्या. आरोपीला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, हे तपासण्यासाठी पोलिस बिहारमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. पीडिता सुमारे सात महिन्यांपूर्वी कोठागुडेम येथून हैदराबादला आली होती. ती एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती आणि कामाच्या ठिकाणाजवळील निवासस्थानी राहत होती.