8 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर अत्याचार, घटनास्थळी आई पोहोचली..

मुंबई तक

• 06:10 PM • 17 Aug 2026

Crime News : 8 वीत शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थीनीसोबत दोन आरोपींनी सामूहिक अत्याचार केला. पीडिता आपल्या शेळ्यांना चारा खाऊ घालण्यासाठी गेली होती. पोलिसांनी विद्यार्थीनीवर केलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पीडितेला शेतात खेचत नेत दोघांनी मिळून केला अत्याचार 

point

पॉक्सो कायद्यांन्वये गुन्हा दाखल

Crime News : उत्तर प्रदेशातील बरेली येथून लज्जास्पद प्रकार उघडकीस आलेला आहे. 8 वीत शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थीनीसोबत दोन आरोपींनी सामूहिक अत्याचार केला. पीडिता आपल्या शेळ्यांना चारा खाऊ घालण्यासाठी गेली होती. पोलिसांनी विद्यार्थीनीवर केलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात एका आरोपीची ओळख समोर आली असून दुसऱ्या आरोपीची ओळख समोर आली नाही. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : घरात 5 वर्षांच्या मुलासह वडिलांचा मृतदेह, पोलिसांना हत्येचा संशय कोणावर?

पीडितेला शेतात खेचत नेत दोघांनी मिळून केला अत्याचार 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींना पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय. पोलीस अधीक्षक मुकेश चंद्र मिश्रने सांगितलं की, ही घटना रविवारी सायंकाळी झाली होती. त्यांनी सांगितलं की, विद्यार्थीनी आपल्या शेजारी राहणाऱ्या आठ वर्षाच्या मुलासोबत शेळ्याना चारा खाऊ घालण्यासाठी गेली होती. अशातच आरोपी मित्राला घेऊन घटनास्थळी पोहोचला आणि दोघांनी मिळून मुलीला खेचत शेतात नेलं. पीडित विद्यार्थीनीने आपल्या आईला या घटनेची माहिती दिली होती. जेव्हा आई घटनास्थळी पोहोचली असता, दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. 

पॉक्सो कायद्यांन्वये गुन्हा दाखल

संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, आईच्या तक्रारीच्या आधारे आरोपींवर सामूहिक अत्याचाराचा पॉक्सो कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला. पीडितेची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. 

हे ही वाचा : 11 वर्षाच्या मुलीवर सावत्र बापाकडून अत्याचार, मुलीनं व्हिडिओ बनवत पितळ उघडं पाडलं

पुढे पोलिसांनी सांगितलं की, आरोपीचा तपास करण्यासाठी तीन पथके घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. आरोपींचा शोध सुरू असून आरोपीची ओळख करण सुरू आहे.