Crime News : एका महिलेनं आपल्याच नवऱ्याच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करत संपवलं. नंतर 22 दिवसांच्या बाळाला मृतदेहाजवळ सोडलं आणि तिने स्वत: रेल्वेखाली उडी मारत जीव दिला. संबंधित प्रकरण हे कौटुंबिक वादातून घडल्याचं सांगण्यात येत आहे. धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील आहे. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : हिंगोली: अशी आई असल्यापेक्षा नसलेली बरी, प्रियकराच्या नादी लागून पोटच्या लेकराला संपवलं
महिलेनं नवऱ्याची हत्या करून रेल्वेखाली उडी मारून संपवलं जीवन
महिलेनं नवऱ्याची हत्या केल्यानंतर नवजात बाळाला घरात कोंडुन ठेवल्यानं त्याचा मृत्यू झाला, तसेच तिने रेल्वेखाली उडी मारत आपलं जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी एसपी बळवंत चौधरी यांनी धाव घेतली. रैनाही पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आणि तपास केला. सांगण्यात येतंय की, मृतकाचे आई-वडील हे शेतात गहू काढण्यासाठी गेले होते. दरम्यान, पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
हे ही वाचा : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी खुशखबर! MPSC कडून 552 जागांसाठी भरती जाहीर, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
अशीच घटना
अयोध्यामध्ये मागील काही वर्षांआधी असाच प्रकार घडला होता. नवऱ्याने मधुचंद्राच्या रात्रीच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीची हत्या केली होती. त्यानंतर स्वत: देखील गळफास घेत जीवन संपवलं. संबंधित प्रकरणातून माहिती समोर आली की, नवऱ्याला आपल्या पत्नीच्या रिलेशनशिपबाबतची माहिती होती. फोनवरील मेसेजवरून दोघांमध्ये वाद झाला होता. याच वादातून तरुणाने आपल्या पत्नीला संपवलं, या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT











