'माझी नाहीस तर कोणाचीच नाहीस', तरुणीने लग्नास दिला नकार, तरुणाने पीडितेला HIV चं इंजेक्शन दिलं, पुढे भयंकर...

Crime News : तरुणाला लग्नास नकार दिल्याने, तरुणाने पीडितेला एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्ताचे इंजेक्शन दिले होते. नंतर पीडितेनं भयभीत होऊन मानसिक तणावातून आपलं जीवन संपवलं. ही दुर्दैवी घटना 11 मार्च रोजी घडल्याचे वृत्त आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

12 Apr 2026 (अपडेटेड: 12 Apr 2026, 08:42 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पीडितेनं लग्नास नकार दिल्याने तरुणाने एचआयव्हीचं इंजेक्शन दिले

point

तरुणीनं घरात गळफास घेत संपवलं जीवन

Crime News : हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. तरुणाला लग्नास नकार दिल्याने, तरुणाने पीडितेला एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्ताचे इंजेक्शन दिले होते. नंतर पीडितेनं भयभीत होऊन मानसिक तणावातून आपलं जीवन संपवलं. ही दुर्दैवी घटना 11 मार्च रोजी हैदराबादमध्ये घडली होती. आरोपीचे नाव मनोहर असे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं चित्र आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला नातेवाईक असून, पीडितेच्या पालकांनी सुरुवातीला तिचे लग्न त्याच्याशी लावून देण्याचे ठरवले होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पैसा-पाणी: इराण युद्धाचं आता होणार तरी काय?

पीडितेनं लग्नास नकार दिल्याने तरुणाने एचआयव्हीचं इंजेक्शन दिले

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला नातेवाईक आहे. पीडितेच्या पालकांनी मनोहर नावाच्या तरुणाशी लग्न ठरवले होते, पण पीडितेनं लग्नास नकार दिल्याने मनोहरने पीडितेला एचआयव्ही रक्ताचे इंजेक्शन दिले. आरोपीचे आई-वडील आधीच एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने, महिलेच्या आई-वडिलांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याचीही चाचणी केली, आणि तोही पॉझिटिव्ह आढळला. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.  

हे ही वाचा : दीड वर्षे शरीसंबंध, नंतर 3 वेळा गर्भपात, लग्नाचे आमिष दाखवून बिल्डरच्या मुलावर बलात्काराचा आरोप

तरुणीनं घरात गळफास घेत संपवलं जीवन

शुक्रवारी, घडलेल्या घटनेनुसार, जवळपास महिनाभर, ती तरुणीनं तिच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. तिच्या कुटुंबियांनी तिला तात्काळपणे सरकारी रुग्णालयात दाखल केले, तिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मानसिक दडपणात होती. एचआयव्ही संसर्गामुळे तिचे मानसिक संतुलनावर परिणाम झाल्याने पीडितेनं टोकाचं पाऊल उचललं असावं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.