Crime news : उत्तर प्रदेशच्या कानपूरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलेच्या बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्याच मुलीवर एक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केला. महिलेनं केलेल्या या तक्रारीनंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा पोलिसांनी जालैन येथील रहिवासी असलेल्या आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि अवघ्या 24 तासांमध्ये त्याला अटक केली. आरोपीचे नाव अजित असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'मुँह में राम और बगल में...', नाशिकच्या कुंभमेळ्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारला झाप झाप झापलं
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या एकूण माहितीनुसार, ही महिला मूळची दिल्लीतील नजफगड येथील रहिवासी आहे. 15 वर्षांपूर्वी विकास नावाच्या तरुणासोबत तिचा विवाह झाला होता. त्यानंतर त्यांना दोन मुलं झाली. या प्रकरणात पीडितेनं सांगितलं की, सुमारे आठ वर्षांपूर्वी तिच्या पतीनं मुलीला सोडून दिलं आणि मुलाला सोबत घेऊन गेला. नंतर, ती तिच्या मुलीसह कानपूर गेली आणि जाजमौ येथील जखाई बाबा मोहल्ला येथे एक घर भाडेतत्त्वावर घेतले.
13 वर्षीय मुलीवर शरीरसंबंधासाठी जबरदस्ती नंतर हत्येची धमकी
महिला उदरनिर्वाहासाठी मजूर म्हणून काम करत होती, काही दिवसानंतर तिची भेट भेळपुरीचं दुकान चालवणाऱ्या एका अजित नावाच्या तरुणासोबत झाली होती. काही काळानंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे नात्यात रुपांतर झाले. महिला ही मजूरीचे काम करायची आणि अजित तिच्या 13 वर्षीय मुलीशी जबरदस्तीने शरीरसंबंध बनवत होता. त्यानंतर त्यानं तिला अनेकदा हत्या करण्याची देखील धमकी दिली होती.
आईला समजताच पायाखालची जमीन सरकली
आपल्यासोबत घडलेल्या या घृणास्पद कृत्याबाबत पीडित मुलीने आपल्या आईला माहिती दिली. तेव्हा आईच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीने सांगितलं की, अजितने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती, याच भीतीमुळे ती नेहमी गप्प राहायची. नंतर तिने हिंमत करून आपल्या आईला सर्व घटना सांगितली. तेव्हा महिला घटनास्थळी दाखल झाली आणि तिने पोलिसांना घडलेल्या एकूण प्रकार सांगितला.
हे ही वाचा : लबाड लांडगा..! भ#वा म्हणत आमदार तान्हाजी मुटकुळे यांना शिवीगाळ, संतोष बांगर यांची जीभ घसरली
संबंधित प्रकरणात जाजमऊ ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पीडित महिलेच्या तक्रारीवरून अजितवर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तेव्हा अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा हे प्रकरण गंभीर असल्याचं समोर आलं आणि आरोपीला अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT











