एकतर्फी प्रेमातून तरुणावर चाकूने सपासप वार, 23 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

crime news : तरुणाने एका मुलीसाठी आपल्याच मित्रांना हाताशी धरून एका तरुणावर चाकूने सपासप वार करत संपवले. रोशनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न पडला असून या घटनेनं दिल्ली हादरून गेली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:50 PM • 17 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रोशनचे एका तरुणीवर जीवापाड प्रेम

point

पोलिसांकडून सीसीटीव्हीचा तपास 

point

मित्रानेच मित्राच्या मैत्रिणीत दाखवला इंटरेस्ट 

Crime News : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीतील गोंविंदपुरी येथील ही घटना आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव रोशन (वय 23) असे आहे. गुरुवारी रात्री पार्वती एकता कॅम्पमध्ये रोशनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न पडला होता. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रोशनला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये नेलं आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला पक्ष प्रवेश दिल्याने विरोधकांनी घेरलं, आता भाजपचा मोठा निर्णय

रोशनचे एका तरुणीवर जीवापाड प्रेम

या प्रकरणात तपासादरम्यान, प्रेमप्रकरण समोर आलं. रोशनचे एका तरुणीवर जीवापाड प्रेम होते, यामुळे प्रिन्स वर्माने संताप व्यक्त केला. त्याने आपल्या साथीदारांसह रोशनची हत्या केली. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला. यानंतर आता पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु ठेवला. 

पोलिसांकडून सीसीटीव्हीचा तपास 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील लावण्यात आलेले सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्ल्यात पाच जणांचा सहभाग असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ पाहणी करून फोनचे लोकेशन तपासून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले. तसेच स्थानिक नेटवर्कचा वापर करत त्यांना या प्रकरणातील पहिला मोठा सुगावा हाती लागला. 

या प्रकरणात पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी प्रिन्स वर्मा आणि अमन उर्फ बुद्ध या दोन आरोपींना अटक केली. सीसीटीव्हा तपासातून त्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसल्या. यामाध्यमातून आरोपींची ओळख पटली. तेव्हा चौकशीनंतर आरोपी नीरज (वय 18) आणि अंगद (वय 19) तसेच इतर तिघांचे गुन्ह्यात नाव होते. यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. 

मित्रानेच मित्राच्या मैत्रिणीत दाखवला इंटरेस्ट 

पोलिसांच्या चौकशीदरम्यान, प्रिन्सने उघड केले की रोशन त्याच्या मैत्रिणीमध्ये अधिकचा रस दाखवू लागला होता. रोशनच्या कृत्याने प्रिन्स अधिक नाराज झाला, तेव्हा त्याने आणि त्याच्या मित्रांनी रोशनला थांबवले आणि त्याला याबाबत विचारले असता, हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले. तेव्हा प्रिन्सने चाकू काढून त्याचाच मित्र रोशनवर चाकूने वार केले. 

हे ही वाचा : माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत तर तुझा पती मरेन, नाशकात भोंदूबाबाचे महिलेवर ब्लॅकमेक करत अत्याचार

या प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास करणं सुरु ठेवला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच हा कट पूर्वनियोजित होता का? असा देखील प्रश्न आता पोलिसांना उपस्थित होत आहे. 

    follow whatsapp